शिवसेनेचे अनेक नाराज आमदार माझ्या संपर्कात - राणेंचा खुलासा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवसेनेचे अनेक नाराज आमदार माझ्या संपर्कात - राणेंचा खुलासा

शिवसेनेचे अनेक नाराज आमदार माझ्या संपर्कात - राणेंचा खुलासा

केंद्रीयमंत्री नारायण राणे विरुद्ध शिवसेना या संघर्षाचा दुसरा अंक आज कोकणात पाहायला मिळाला. पोलिसांच्या अटकेच्या कारवाईनंतर ठप्प झालेली राणे यांची जनसंघर्ष यात्रा आज पुन्हा रत्नागिरी शहरातून सुरू झाली. तिचा समारोप सिंधुदुर्गमध्ये झाला. या दोन्ही ठिकाणांवर राणेंनी नेहमीच्या आक्रमक शैलीत शिवसेनेवर निशाणा साधला तर त्याला शिवसेना नेत्यांनीही त्याच भाषेत उत्तर दिल्याने आरोप-प्रत्यारोपांचे वार पाहायला मिळाले.

खासदार विनायक राऊत आणि संजय राऊत हे दोघेही शिवसेनेला बुडवतील. शिवसेनेत नाराज असलेले अनेक आमदार माझ्या संपर्कात आहेत. भविष्यात महाराष्ट्रात आमचेच सरकार असेल. राणेंच्या पाठीमागे लागू नका, मी आत्ता थोडे बोलतोय, बोलायला लागलो तर ते तुम्हाला परवडणार नाही, अशा इशाराही नारायण राणे यांनी दिला. जनआशीर्वाद यात्रेनिमित्त मी रत्नागिरी दौऱ्यावर असताना माझ्यावर केलेली कारवाई कायदेशीर नव्हती. जबरदस्तीने ती करण्यात आली.

हेही वाचा: "नारायण राणे शिवसेना-भाजपला एकत्र आणण्याचे प्रयत्न करताहेत"

सत्तेची मस्ती दाखविण्याचा काहींचा प्रयत्न आहे. कारवाई करा पण कायदेशीर करा. कायद्याबाहेर जाऊन कराल तर सामोरे जावे लागेल, असा इशाराही राणे यांनी दिला. राज्यात कोरोनामुळे १ लाख २७ हजाराच्यावर माणसांचा मृत्यू झाला. देशात सर्वांत जास्त मृत्यू महाराष्ट्रात आहेत ही यांची ख्याती. बंधने फक्त नारायण राणे यांच्यासाठी. देशात राहतो आम्हाला मनाई का? सत्तेची मस्ती आहे दुसरे काही नाही. राज्यात कायदा सुव्यवस्था राहिलेली नसल्याचा आरोपही राणे यांनी केला.

हेही वाचा: टप्प्याटप्प्याने सगळे बाहेर काढणार - राणेंचा शिवसेनाला इशारा

राणे म्हणाले, ‘‘जनआशीर्वाद यात्रेमुळे लोकांचे प्रश्न जाणून घेता आले. या यात्रेला चांगला प्रतिसाद मिळाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला केंद्रीय मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून घेतलं. कोकणच्या सुपुत्राला केंद्रात मंत्रिपद दिले. मी त्यांचा आभारी आहे. जनआशीर्वाद यात्रेसाठी रत्नागिरीत आलो. पूर, वादळ याची माहिती घेऊन शासनाकडून काही मदत मिळाली की नाही याची माहिती घेतली. याचा एकत्रित अहवाल पंतप्रधान मोदींना सादर करण्यात येणार आहे.’’

हेही वाचा: पाऊस पुन्हा सक्रीय होणार, राज्यात पुढील पाच दिवस मुसळधार!

Web Title: Bj Narayan Rane Says Many Shiv Sena Mlas Touch With Me Jan Ashirwad Yatra

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Shiv SenaNarayan Rane