bjp party
sakal
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या काळात बंडखोरी केलेल्यांसह पक्षशिस्तीचा भंग केल्याप्रकरणी निलंबित भाजपच्या १३ पदाधिकाऱ्यांचे निलंबन अखेर मागे घेण्यात आले. यात अपक्ष निवडून आलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचाही समावेश आहे. ही माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी दिली.