स्वाभिमानी भाजप युतीस अद्यापही तयार 

मृणालिनी नानिवडेकर : सकाळ न्यूज नेटवर्क 
सोमवार, 23 जानेवारी 2017

मुंबई -  महाराष्ट्रातील हिंदुत्ववादी युतीत बिघाडी येऊ नये यासाठी शिवसेनेशी चर्चा करण्यास भाजपने तयारी दाखवली आहे. मात्र, भाजपची वाढलेली शक्‍ती लक्षात घेता 110 जागांपेक्षा कमी जागांवर तडजोड करणे योग्य होणार नाही, अशी भाजप नेत्यांची भूमिका आहे.

वारंवार अपमान करणाऱ्या शिवसेनेला युतीसंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वतःहून दूरध्वनी करू नये, असे आग्रही प्रतिपादनही आज भाजप नेत्यांनी केले. "वर्षा'वर आज सुमारे चार तास मुंबईतील भाजपच्या निवडणूक समितीने परिस्थितीचा आढावा घेतला.

या बैठकीत जाहीरनामा आणि पारदर्शी कारभारावर चर्चा झाल्याचे सांगितले असले, तरी प्रत्यक्षात शिवसेनेबद्दल आमदारांनी कमालीचा रोष व्यक्‍त केला. 60 जागा देतो असे सांगणाऱ्या शिवसेनेने ठाण्यात त्यांची शक्‍ती वाढल्याने निवडून आलेला खासदार असतानाही भाजपने ही जागा सोडून दिली होती हे लक्षात घ्यावे आणि आता बदललेल्या परिस्थितीत मुंबईत भाजपला जास्त जागा देणे हे शिवसेनेचे कर्तव्य असल्याचे या वेळी भाजप नेत्यांनी ठणकावून सांगितले. शिवसेना गेल्या काही महिन्यांपासून भाजपचा अपमान करण्याची एकही संधी सोडत नाही, असे मुंबईच्या निवडणूक समितीचे मत होते. शिवसेनेबद्दलचा रोष शांत करण्यासाठी सहकारी पक्षासंबंधातील आगपाखड प्रसिद्धीमाध्यमांपर्यंत पोचू देऊ नका, असा दम मुख्यमंत्र्यांनी दिला. यानंतर भाजपच्या नेत्यांनी मौन बाळगले असले, तरी शिवसेनेबद्दलची अढी या वेळी सतत व्यक्‍त होत होती. सतत दबलेल्या अन्‌ युतीत भरडल्या जाणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी मिळाल्यास भाजपच्या शंभराच्यावर जागा निवडून येतील, असा विश्‍वास या वेळी व्यक्‍त करण्यात आल्याचे समजते. शिवसेना म्हणतेय दर निवडणुकीत त्याग कसा करणार? 

दरम्यान, युतीबाबतचा ठोस प्रस्ताव अद्याप आला नसल्याचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज स्पष्ट केले आहे. शिवसेनेतील काही मंडळी भाजपला 90 ते 95 जागा देण्याच्या तयारीत आहेतट मात्र, ही कुणकुण लागताच संजय राऊत यांनी भाजपची ताकद लक्षात घेता 60 जागा देणे योग्यच आहे असे सांगितले. शिवसेनेतील सूत्रांनी देवेंद्र फडणवीस या तिढ्यातून सामोपचाराने मार्ग काढण्यासाठी उद्धवजींशी संपर्क साधतील असा विश्‍वास ठेवला होता. मात्र, दर निवडणुकीत आम्ही भाजपसाठी अधिकाधिक वॉर्ड कसे देणार, असा प्रश्‍नही ठाकरे यांचे जवळचे नेते करीत होते. खासदार अनिल देसाई यांनी शिवसेनेने मुंबईकरांसाठी मोठे काम केले आहे, असे असतानाही आम्ही निवडणुकीत जागांचा त्याग करत राहिलो, तर शिवसैनिक नाराज होणार नाहीत काय, असा सवाल केला. उद्या, ता. 23 जानेवारी रोजी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त होणाऱ्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे काय बोलणार, याकडे शिवसैनिकांचे लक्ष लागले आहे. 

Web Title: BJP alliance for ready