महाडच्या स्वीकृत नगरसेवक निवडीवर आक्षेप पुरावे, कागदपत्रे खोटी असल्याचा राष्ट्रवादी काँग्रेस-भाजपचा आरोप

Mahad Municipal Council: महाडच्या स्वीकृत नगरसेवक निवडीवरून राजकीय वाद निर्माण झाला आहे. पुरावे आणि कागदपत्रे खोटी असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपने केला आहे.
Mahad Municipal Council

Mahad Municipal Council

ESakal

Updated on: 

महाड : येथील नगर परिषदेमधील शिवसेनेचे स्वीकृत नगरसेवक सनी जाधव यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त जागेवरील निवडीसाठी नगराध्यक्ष सुनील कविस्कर यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (ता. १८) नगर परिषदेची विशेष सभा घेण्यात आली होती. या सभेत शिवसेनेकडून राजेंद्र शिंदे यांची स्वीकृत नगरसेवकपदी निवड करण्यात आली, मात्र सभेच्या सुरुवातीलाच सादर केलेले पुरावे, कागदपत्रे खोटी असल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेस-भाजप युतीच्या नगरसेवकांनी या निवडीवर आक्षेप घेतला.

Loading content, please wait...