भाजप मारणार एकतर्फी मैदान; कौल पुन्हा युतीच्याच बाजूने

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 सप्टेंबर 2019

एबीपी माझा - सी व्होटर यांनी केलेल्या सर्वेक्षणात भाजपला राज्यात पुन्हा मोठे यश मिळू शकते, असे चित्र आहे. भाजप आणि शिवसेना वेगवेगळे लढल्यास त्याचा शिवसेनेला मोठा फटका बसण्याची शक्‍यता आहे.

मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर वृत्तवाहिन्यांनी केलेल्या ताज्या सर्वेक्षणाचे निष्कर्ष जाहीर केले. त्यानुसार सत्ताधारी भाजप- शिवसेनेची युती पुन्हा सत्तेवर येण्याची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे. 

एबीपी माझा - सी व्होटर यांनी केलेल्या सर्वेक्षणात भाजपला राज्यात पुन्हा मोठे यश मिळू शकते, असे चित्र आहे. भाजप आणि शिवसेना वेगवेगळे लढल्यास त्याचा शिवसेनेला मोठा फटका बसण्याची शक्‍यता आहे. युती न झाल्यास भाजप 144 जागांसह स्वबळावर सत्तेवर येऊ शकतो, तर अशा स्थितीत शिवसेनेला अवघ्या 39 जागांवर समाधान मानावे लागणार असल्याचे दिसते. भाजप व शिवसेनेची युती झाल्यास 205 जागांसह सत्तेचा मार्ग मोकळा होऊ शकतो, असे दिसते आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला या वेळीही विरोधी बाकांवरच बसावे लागणार असल्याचे प्राथमिक सर्वेक्षणातून समोर आले आहे. 

वंचित बहुजन आघाडी या निवडणुकीत चांगली कामगिरी करण्याची शक्‍यता असून, या पक्षाचा विधानसभेत प्रवेश होऊ शकतो, असे दिसून येते. 

एबीपी माझा- सी व्होटर 
स्वतंत्र लढल्यास 

भाजप : 144 
शिवसेना : 39 
कॉंग्रेस : 21 
राष्ट्रवादी कॉंग्रेस : 20 
मनसे : 00 
इतर : 64 

महायुती आणि महाआघाडी झाल्यास 
महायुती : 205 
महाआघाडी : 55 
इतर : 28 

झी 24 तास 
स्वबळावर लढल्यास 

भाजप : 122 
शिवसेना : 52 
कॉंग्रेस : 48 
राष्ट्रवादी कॉंग्रेस : 45 
इतर : 21 

युती, आघाडी झाल्यास 
भाजप : 143 
शिवसेना : 83 
कॉंग्रेस : 26 
राष्ट्रवादी कॉंग्रेस : 26 
इतर : 10 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP and Shivsena gives majority in Maharashtra Vidhan Sabha 2019 election