Vidhan Sabha 2019 : भाजपकडून 12 विद्यमान आमदारांना डच्चू; यादी जाहीर

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 1 October 2019

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने अखेर आज (मंगळवार) 125 उमेदवारांची जाहीर करताना, 12 विद्यमान आमदारांना डच्चू दिला आहे. तर, विद्यमान 52 आमदारांना उमेदवारी पुन्हा देण्यात आली आहे.

नवी दिल्ली : विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने अखेर आज (मंगळवार) 125 उमेदवारांची जाहीर करताना, 12 विद्यमान आमदारांना डच्चू दिला आहे. तर, विद्यमान 52 आमदारांना उमेदवारी पुन्हा देण्यात आली आहे.

शहाद्यातून राजेश पडवी, साताऱ्यातून शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना उमेदवारी देण्यात आले आहे. अतुल पाटील कराड दक्षिणमधून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याविरोधात भाजपचे उमेदवार असतील. इंदापूरमधून हर्षवर्धन पाटील, शिवाजीनगर सिद्धार्थ शिरोळे, योगेश टिळेकर यांना हडपसरमधून, खडकवासल्यातून भिमराव तापकीर यांना उमेदवारी जाहीर करण्यात  आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP declares list of 125 candidates for Maharashtra Vindhan Sabha 2019