Bhagat Singh Koshyari | मला न बोलण्याचे आदेश...कॅमेरे दिसताच कोश्यारींचा काढता पाय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Bhagat Singh Koshyari

मला न बोलण्याचे आदेश...कॅमेरे दिसताच कोश्यारींचा काढता पाय

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सध्या चर्चेत आले आहेत. मुंबई बाबत त्यांनी केलेलं वक्तव्य हे चांगलंच वादात सापडलं होतं. त्यानंतर त्यांनी त्यासंदर्भात माफीदेखील मागितली. दरम्यान, माध्यमांशी बोलताना मौन बाळगण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचा खुलासा त्यांनी केला.(Bjp Give Orders To Governor Bhagat Singh Koshyari Not To Speak Infornt Of Media)

महाराष्ट्र सदनात त्यांच्या हस्ते 'हर घर तिरंगा' अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी प्रसारमाध्यमांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी बोलण टाळलं. प्रसारमाध्यमांचे कॅमेरे दिसताच पाठ करुन त्यांनी काढता पाय घेतला. मात्र, यावेळी त्यांनी मोघम वक्तव्य केले जे सध्या चर्चेत आलं आहे.

माध्यमांचा आग्रहा पाहता मी बोलणार नाही. इथे मुख्यमंत्री आहेत, त्यांच्याशी बोला. मला बोलायचेच नाही. राज्यपालांना न बोलण्याचे आदेश दिले आहेत, अशी दोनचार मोघम वाक्य त्यांनी बोलली. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्यपाल हे घटनात्मक पद असल्याने त्यांना अशाप्रकारे बोलण्यास कोणी मनाई करू शकते का? अशी नवी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी काय केलं होत वादग्रस्त वक्तव्य

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी नुकतेच मुंबईतील एका कार्यक्रमात वादग्रस्त वादग्रस्त वक्तव्य केल होत. गुजराथी आणि मारवाडी लोक निघून गेले तर मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही, असे त्यांनी म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली होती.

Web Title: Bjp Give Orders To Governor Bhagat Singh Koshyari Not To Speak Infornt Of Media

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..