अन्यथा राज्यभर तांडव!! भाजपची शिवसेनेला 'फायनल वॉर्निंग'

Shivsena Party Workers
Shivsena Party Workers

"ही झुंडशाही पाहून तालिबानीही शरमेने आत्महत्या करतील"

Narayan Rane vs Shivsena - इंदापूर: केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवीस (Devendra Fadnavis) यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. संयम सगळ्यांनीच ठेवायला हवा. मुख्यमंत्री (Chief Minister Post) पदाबाबत नक्कीच आदर ठेवला पाहिजे, त्यामुळे संयमाची अपेक्षा पक्षाने स्पष्ट बोलून दाखवली आहे. पण त्यानंतर सुद्धा आपल्याला राज्यभर झुंडशाही (Mob Ruling) दिसत आहे. शिवसेनेने (Shivsena) भाजप कार्यालयांसमोरील (BJP Offices) तमाशा बंद करावा नाही तर राज्यभर तांडव (Big Fight) होईल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी ही मुख्यमंत्री (CM Uddhav Thackeray) आणि महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) असेल, असा स्पष्ट इशारा भाजपचे आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी दिला.

Shivsena Party Workers
दोन-चार दगड मारण्यात कसला पुरुषार्थ? - नारायण राणे

सोलापूर दौऱ्यात इंदापूर येथे पत्रकारांशी बोलताना आमदार अँड आशिष शेलार म्हणाले, "जी माहिती मला मिळाली त्यामध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना राज्य सरकारच्या पोलिसांच्या वतीने अटक करण्यात आली आहे. या अटकेचा आम्ही संपूर्णत: निषेध आणि धिक्कार करतो. राज्य सरकारला आणि विशेषत: शिवसेनेला यातला गर्भित इशारा आम्ही देऊ इच्छितो की सुरुवात तुम्ही केलीय शेवट आम्ही करु. ज्या पद्धतीने या सगळ्या प्रकरणात राज्य सरकार वागते आहे, ते पाहून तालिबानीसुद्धा शरमेने आत्महत्या करतील एवढी झुंडशाही महाविकास आघाडीची लोक करत आहेत", अशी सडकून टीका त्यांनी केली.

MLA Ashish Shelar
MLA Ashish Shelar
Shivsena Party Workers
'नारायण राणे कोंबडी चोर' च्या घोषणा देत शिवसेनेचे आंदोलन

"मंत्री नारायण राणेंच्या वक्तव्याविषयी देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. संयम सगळयांनीच ठेवायला हवा. मुख्यमंत्री पदाबाबत नक्कीच ठेवला पाहिजे. त्यामुळे संयमाची अपेक्षा पक्षाने स्पष्ट बोलून दाखवली. त्यानंतर सुद्धा झुंडशाही राज्यभर बघतो आहोत. शिवसेनेने हा तमाशा बंद करावा. या कारवाईनंतर मंत्री अनिल परब यांची क्लिपसुद्धा बाहेर आली आहे. राणे साहेबांनी स्वत: सांगितलं आहे की मी गुन्हा केलेला नाही. कुणाच्या म्हणण्यावरुन गुन्हे दाखल होत असतील, तर लक्षात ठेवा की तुम्ही क्लिप दाखवताय, आमच्याकडे सीडी आहे. जर त्या सीडी बाहेर आल्या तर महाविकास आघाडीमधील जे पक्ष आता मांडीला मांडी लावून बसलेत तेच ऐकमेकांवर केसेस दाखल करतील. कारण अशी सीडी, अशी वक्तव्य, अपमान आम्ही दाखवून देऊ शकतो", असे सूचक विधान शेलार यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com