
सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं पालन करत अनाधिकृत भोंगे उतरवावेत असं आवाहन राज ठाकरेंनी केले.
'सेनेतील राष्ट्रवादी प्रवक्ते राऊतांनी धार्मिक तेढ निर्माण होणारी वक्तव्य करु नयेत'
सध्या भोंग्यांविरुद्ध मनसेने घेतलेल्या भूमिकेवरुन राज्याचे वातावरण चांगलंच ढवळून निघाले आहे. यावरुन राज्यातील महाविकास आघाडी आणि मनसे यांच्यातील वाद चिघळण्याची शक्यता आहे. दरम्यान, आता या वादात भाजपाने उडी घेतली असून नेते केशव उपाध्ये यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचे चाहते आणि शिवसेनेतील राष्ट्रवादीचे प्रवक्ते संजय राऊत विनाकारण लोकांमध्ये संभ्रम निर्माण करून धार्मिक तेढ निर्माण होणारी वक्तव्य करत असल्याची खरमरीत टीका त्यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी एक ट्विट केलं आहे.
हेही वाचा: राज्यातील निवडणुकांचा मार्ग मोकळा; SCचे महत्वाचे आदेश
यात केशव उपाध्ये म्हणतात, एका दिवसांत ८०० मशिदीवरील भोंग्यांना परवानगी देण्यात येते म्हणजे कालपर्यंत हे सगळं अनाधिकृत सुरू होतं याची कल्पना सरकारला होती. मूळात कायद्याचं पालन सर्वांनीच करणं गरजेचे आहे. कायदा हा सर्वांसाठी एकसमान आहे. मग अनाधिकृत भोंग्याविरोधात कारवाई करण्याची हिंमत महाविकास आघाडी सरकारमध्ये नाही म्हणून अशाप्रकारे विरोधकांना अडकवण्याचा कटकारस्थान करत आहेत. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं पालन करत अनाधिकृत भोंगे उतरवावेत असं आवाहन राज ठाकरेंनी केले. मात्र सरकार त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करत आहे. त्यात हनुमान चालीसा वाजवतील म्हणून हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची धरपकड सुरू आहे. शरद पवारांचे चाहते आणि शिवसेनेतील राष्ट्रवादीचे प्रवक्ते संजय राऊत विनाकारण लोकांमध्ये संभ्रम निर्माण करून धार्मिक तेढ निर्माण होणारी वक्तव्य करत आहेत. राज्यात कुठेही दंगलसदृश्य परिस्थिती नाही. तरीही उगाच दंगल, तेढ, अशांतता अशी विधानं करून सरकारचं धार्मिक तेढ निर्माण करण्याचं राजकारण तर करत नाही ना? अशी शंका उपस्थित होत आहे, असंही ते म्हणाले आहेत.
हेही वाचा: राणा दाम्पत्याला अखेर दिलासा, न्यायालयाकडून जामीन मंजूर
दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर राज्यभरातल्या विविध ठिकाणी मनसैनिकांनी मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात आंदोलन सुरू केलं आहे. अनेक ठिकाणी सकाळच्या अजानच्या वेळी हनुमान चालिसा लावण्यात आली होती. (Hanuma Chalisa Row) राज्य सरकारने काल राज ठाकरेंसह पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांवरही कारवाईला सुरूवात केली. पण तरी मनसे आपल्या भूमिकेवर ठाम आहे. त्यामुळे पोलीस रात्रीपासूनच सतर्क आहेत. आज सकाळी राज्यातल्या विविध भागांमध्ये पोलिसांनी मनसैनिकांची धरपकड केली आहे.
Web Title: Bjp Keshav Upadhye Criticized On Sanjay Raut On Statement Of Creates Religious Rift
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..