राज्यातल्या शेतकऱ्याला सुखी कर; चंद्रकांत पाटील यांचे विठ्ठलाला साकडे 

Bjp leader chandrakant patil statement after official pooja at pandharpur vitthal temple
Bjp leader chandrakant patil statement after official pooja at pandharpur vitthal temple

पंढरपूर : "राज्यातील  शेतकरी आणि सामान्य जनता सुखी होऊ दे," असं साकडं महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज पंढरपूरच्य विठ्ठल चरणी घातलं.  चंद्रकांत पाटील  यांच्या हस्ते आज कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी यांची शासकीय महापूजा झाली. त्यानंतर संत तुकाराम भवन येथे झालेल्या कार्यक्रमात श्री. पाटील यांच्या हस्ते मानाचे वारकरी  सुनील महादेव ओमासे आणि सौ. नंदा ओमासे यांचा सत्कार करण्यात आला. 

श्री. पाटील म्हणाले, "यावर्षी राज्यासमोर अनेक आव्हाने आली. सुरुवातीला  दुष्काळस्थिती होती. त्यानंतर महापुराला सामोरे जावे लागले आणि आता अवकाळी पावसामुळे शेतीचे आतोनात नुकसान झाले आहे. या आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी राज्यशासनाने उपाययोजना केल्या आहेत. केंद्र सरकारकडेही  मदत  मागितली आहे’.

गेली तीन चार वर्षे वारी निर्मल वारी करण्यासाठी प्रयत्न केला गेला.  वारीच्या मुक्कामाच्या ठिकाणी स्वच्छता ठेवण्यासाठी प्रयत्न केले गेले. त्याला अतिशय चांगले यश आले. पुढील वर्षी धूरमुक्त वारी करण्यासाठी शासन प्रयत्नशील असणार आहे."

बेडगचे ओमासे  मानाचे वारकरी
मानाचा वारकरी ठरलेले सुनील ओमासे  बेडग (ता. मिरज जि. सांगली) येथील आहेत. शेतकरी कुटुंबातील ओमासे २००३ पासून वारी करतात. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. त्यांना चांदीची विठ्ठल रुक्मिणी मूर्ती, शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. त्यांना मोफत एसटी पासही देण्यात आला. या वेळी विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर,  जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, अंजली पाटील, शकुंतला नडगिरे, रामचंद्र कदम, ह.भ.प. शिवाजीराव मोरे, संभाजी शिंदे, अतुलशास्त्री भगरे, ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, माजी अध्यक्ष अतुल भोसले, पोलीस अधिक्षक मनोज पाटील, प्रांतधिकारी सचिन ढोले, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे, मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी , तहसिलदार वैशाली वाघमारे उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com