'विक्रांत'प्रकरणी आम्ही दमडीचाही घोटाळा केला नाही; सोमय्यांचं संजय राऊतांना प्रत्युत्तर I Kirit Somaiya on INS Vikrant Case | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kirit Somaiya on INS Vikrant Case

राज्यात शिवसेना आणि भाजपमध्ये चांगलीच जुंपल्याचं पहायला मिळत आहे.

'विक्रांत'प्रकरणी आम्ही दमडीचाही घोटाळा केला नाही : किरीट सोमय्या

मुंबई : राज्यात शिवसेना आणि भाजपमध्ये चांगलीच जुंपल्याचं पहायला मिळत आहे. त्यातच आता भाजप नेते किरीट सोमय्या (BJP leader Kirit Somaiya) एक-एक करत शिवसेना नेत्यांचे घोटाळे बाहेर काढत आहेत. आता शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) सोमय्यांच्या रडारवर आहेत. काल संजय राऊतांनी केलेल्या आरोपाला किरीट सोमय्यांनी जोरदार प्रत्युतर दिलंय.

सोमय्या म्हणाले, संजय राऊत माझ्याबाबतच्या पुराव्याचा एकही कागद देऊ शकत नाही. तसंच आम्ही कोणत्याही चौकशीला सामोरे जायला तयार आहोत. विक्रांत प्रकरणी आम्ही एक दमडीचाही घोटाळा केला नाही, त्यामुळं कोणाला घाबरण्याचं काही कारण नाहीय, असं स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केलंय.

हेही वाचा: पंजाब जिंकणाऱ्या 'आप'ला मोठा धक्का; 150 नेत्यांनी केला भाजपात प्रवेश

काय म्हणाले संजय राऊत?

संजय राऊत यांनी काल किरीट सोमय्यांवर नव्यानं आरोप करत 'आएनएस विक्रांत फाइल्स' (INS Vikrant Files) उघड केली. संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत म्हंटलं की, आयएनएस विक्रांत वाचवण्यासाठी जमा करण्यात आलेला निधी हा राज्यपालांकडं सुपूर्द करण्यात येणार असल्याचं सोमय्यांनी म्हंटलं होतं. आरटीआय कार्यकर्ते विरेंद्र उपाध्ये यांनी राज्यपाल कार्यालयाकडून याबाबत ही माहिती मागवली होती. मात्र, राज्यपाल कार्यालयात असा कोणताही निधी मिळाला नसल्याची माहिती राज्यपाल कार्यालयानं दिली असल्याचं राऊतांनी म्हंटलं. ही माहिती मागील महिन्यात आली असल्याचं राऊतांनी सांगितलंय. आयएनएस विक्रांत भंगारात काढण्याविरोधात किरीट सोमय्या यांनी आंदोलन केलं होतं. आयएनएस विक्रांत वाचवण्यासाठी त्यांनी लोकांकडून निधी जमवला होता. मुंबईमध्ये अनेक ठिकाणी किरीट सोमय्या यांनी निधी गोळा करायला सुरुवात केली होती. या दरम्यान 57 ते 58 कोटी रुपयांचा निधी जमा करण्यात होता. सोमय्या यांच्यासह इतर भाजप नेतेदेखील सहभागी होते. मात्र, या भ्रष्टाचाराच्या कटाचे प्रमुख सोमय्या होते, असा आरोप संजय राऊत यांनी केलाय.

Web Title: Bjp Leader Kirit Somaiya Criticizes Sanjay Raut In Ins Vikrant Files Case

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..