मुश्रीफ, अजित पवारांचे कारखान्यातील 'घोटाळे' बाहेर काढणार : सोमय्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kirit Somaiya

भाजप नेते सोमय्या यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar), उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यानंतर मंत्री हसन मुश्रीफ यांनाही टार्गेट केलंय.

मुश्रीफ, अजित पवारांचे कारखान्यातील 'घोटाळे' बाहेर काढणार : सोमय्या

कऱ्हाड (सातारा) : मंत्री हसन मुश्रीफ (Minister Hasan Mushrif) यांनी गडहिंग्लज येथील आप्पासाहेब नलावडे सहकारी साखर कारखान्यात (Appasaheb Nalawade Cooperative Sugar Factory) १०० कोटींचा घोटाळा तर उपमुख्यमंत्री अजीत पवार यांचा घोटाळा जरंडेश्वर कारखान्यातील (Jarandeshwar Factory) घोटाळाही बाहेर काढणार आहे, असा इशारा भाजप नेते किरीट सोमय्या (BJP leader Kirit Somaiya) यांनी कऱ्हाड येथे झालेल्या पत्रकार परिषेदत दिला. अजित पवारांमध्ये (Ajit Pawar) हिम्मत असल्यास त्यांनी जरंडेश्वर कारखान्याच्या व्हॅल्यूएशनचे कागद लोकांसमोर ठेवावीत. ६५ कोटीत कारखाना घेतला अन् ७०० कोटीचं बँकेचे कर्ज घेतले, याचाही हिशोब द्या तर मंत्री मुश्रीफ यांनी मनी लॉड्रींगचा पैसा कारखान्यात वापरून घोटाळा केला आहे, असेही आरोप सोमय्या यांनी केले आहेत.

भाजप नेते सोमय्या यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar), उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यानंतर मंत्री हसन मुश्रीफ यांनाही टार्गेट केले आहे. सोमय्यांनी मुश्रीफांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. किरीट सोमय्या कोल्हापूरला जाणार होते. ते महालक्ष्मी एक्सप्रेसने निघाले होते. मात्र, त्यांना कऱ्हाडमध्ये पोलिसांनी उतरवलं. कोल्हापूरला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी कऱ्हाडला सातारा व कोल्हापूर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर सोमय्या यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकेर, ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजीत पवार, गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील, मंत्री हसन मुश्रीफांवर त्यांनी बेछुट आरोप केले. सोमय्या यांनी मंत्री मुश्रीफ यांचे घोटाळे जनतेसमोर मांडण्याची देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांची आहे, तर त्या घोटाळ्याबाबत ईडीकडे कागदपत्रे देणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा: भाजपचं 'ऑफर लेटर' रस्त्यावर पडलंय का?

सोमय्या म्हणाले, मी अर्थमंत्रालय, इन्कम टॅक्स चेअरमन, ईडीचे संचालक, सहकार मंत्रालयामध्ये दोन हजार ७०० पानांचे पुरावे दिले आहेत. त्यावर चौकशी सुरु झालीय. मागवलेली अधिक माहितीही दोन दिवसांत मिळेल. ती माहिती ईडी आणि संचालक मंडळाला देणार आहे. त्या चौकाशीला घाबरूनच राष्ट्रवादीचे गुंड माझ्यावर हल्ला करत आहेत. त्या गुंड प्रवृत्तीच्या कार्यकर्त्यांना नक्कीच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा वरदहस्त आहे, मला अटकावसह स्थानबध्द करण्यासह कोल्हापूर बंदीची शरद पवारांचीच व्यूव्हरचना आहे, असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला. मंत्री हसन मुश्रीफ यांनी आपल्या कंपनीत १२७ कोटी रूपये मनी लाँड्रिंगचे आणले आहेत. त्याचा हिशेब त्यांनी अजून का दिला नाही, याचा खुलासा करावा. ही तर ज्येष्ठ नेते पवार यांची तर व्यूहरचना तर नाही ना, हसन मुश्रीफ यांनी गडहिंग्लज येथील आप्पासाहेब नलावडे सहकारी साखर कारखान्यात १०० कोटींचा घोटाळा केला आहे. सेनापती तानाजी घोरपडे व नलावडे कारखान्यात ५० कोटींचे व्यवहार झालेत. ते बेहिशोबी आहेत. तो कारखाना २०२० मध्ये पारदर्शकपणा शिवाय एका कंपनीला देण्यात आला.

हेही वाचा: मुश्रीफांचे घोटाळे बाहेर काढा अशी फडणवीस, पाटलांची सूचना : सोमय्या

ब्रिक्स इंडिया कंपनी (BRICS India Company) ही बेनामी कंपनी आहे. यातील ९८ टक्के शेअर्स कोलकात्याचे आहेत. तर केवळ दोन टक्के शेअर्स हसन मुश्रीफ यांच्या जावायांचे आहेत. कोणताही साखर कारखाना चालवण्याचा अनुभव नसलेल्या कंपनीकडे जबाबदारी दिली. ती का दिली ते शरद पवारांना माहिती आहे. हसन मुश्रीफांचे जावई मतिन त्या कंपनीचे मालक आहेत. पुढच्या आठवड्यात मंत्री मुश्रीफ यांचा तिसरा घोटाळा उघड करणार आहे. राज्यातील सरकार शरद पवार चालवत आहेत. त्या सगळ्याची माहिती त्यांना आहेच, त्यामुळे त्यावर कारवाई होत नाही. मंत्री मुश्रीफ यांचा एक घोटाळा बाहेर काढला. त्यानंतर त्यांना रुग्णालयात जावं लागलं. दुसरा घोटाळा उघडकीस आल्यानंतर त्यांना तुरुंगात जावं लागेल. त्यामुळे मला रोखण्यासाठी महाविकास आघाडी सरकारचे प्रयत्न सुरु आहेत.राज्य सरकारने हसन मुश्रीफांच्या स्वागतासाठी जनसमुदायाला परवानगी दिली आहे. मात्र मला कोल्हापुराला येण्यास बंदी घातली आहे. हा कसला न्याय आहे, याउलट उद्धव ठाकरे सरकारची उद्धटगिरी चालून देणार नाही. अडविण्यासाठी जो काही पोलिस फोर्स वापरला तो फोर्स दम असेल तर घोटाळेबाजांना अटक करण्यासाठी वापरावा. ठाकरे सरकारविरूध्द केलेल्या तक्रारीवर चौकशी सुरू आहे. ईडीने अतिरिक्त माहिती माझ्याकडे मागवली आहे. त्या भीतीने माझ्यावर हल्ला करणार आहेात का, त्यासाठी शरद पवार यांची रणनीती आहे.

हेही वाचा: ठाकरे सरकारनं घरात कोंडून ठेवलं, मला धक्काबुक्की केली

अजित पवारांना जरंडेश्वरचे आव्हान

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही टार्गेट केले आहे. ते म्हणाले, अजीत पवार यांचा घोटाळा जरंडेश्वर कारखान्यातील घोटाळा ३० तारखेला उघड करण्यासाठी तेथे भेट देणार आहे. त्याची पाहणी करणार आहे. त्याचीही चौकशीची मागणी करणार आहे. उपमुख्यमंत्री पवारांमध्ये हिम्मत असल्यास जरंडेश्वर कारखान्याच्या व्हॅल्यूएशनचे कागद का लोकांसमोर ठेवावीत. ६५ कोटीत कारखाना घेतला अन् ७०० कोटीचं बँकेचं कर्ज घेतलंय. जरंडेश्वरच्या एका व्हॅल्यूअरचं नाव वैभव शिंदे आहे, यातून सारं काही स्पष्ट होते.

Web Title: Bjp Leader Kirit Somaiya Criticizes Sharad Pawar Ajit Pawar And Hasan Mushrif

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top