सगळे लाचारीनं चिटकलेत, काँग्रेसचा विषय तर हास्यास्पद वाटतोय; सुजय विखे पाटलांची टीका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

BJP leader MP Sujay Vikhe Patil criticizes Congress

'महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची हिम्मत काॅंग्रेसमध्ये नाही.'

सगळे लाचारीनं चिटकलेत, काँग्रेसचा विषय तर हास्यास्पद वाटतोय; सुजय विखे पाटलांची टीका

शिर्डी : सरकार स्थापन होवून तब्बल एक महिना उलटून गेल्यानंतर राज्याच्या मंत्री मंडळाचा (Maharashtra Cabinet Expansion) विस्तार झाला. आता मंत्रीमंडळाच्या खाते वाटपाचा मात्र अजूनही मुहूर्त लागेना. विरोधकांकडून यावर जोरदार टीका होताना दिसत आहे.

एवढचं नाही तर संबंधित मंत्री मंडळ विस्तारावर पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी देखील आपली प्रतिक्रीया देत भाजपला घरचा अहेर दिला होता. 18 आमदारांचा शपथ विधी पार पडल्यानंतर आता कुणाला कुठलं खातं दिल्या जाणार याकडं संपूर्ण महाराष्ट्राचं (Maharashtra) लक्ष लागलंय. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांनी आपली प्रतिक्रिया दिलीय.

राज्यात खातं वाटप झालेलं नसलं तरी कुणाचंही काम अडलेलं नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दोघेही सक्षम नेते आहेत. ते राज्याच्या हिताचे निर्णय घेताहेत, असं मत सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केलंय. दरम्यान, महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची हिम्मत काॅंग्रेसमध्ये नसल्याचा टोलाही खासदार पाटील यांनी शिर्डीत (Shirdi) काॅंग्रेसला लगावला. खासदार सुजय विखे पाटील हे शिर्डीत आले होते. त्यावेळी माध्यमांच्या प्रश्नांना त्यांनी उत्तर देताना राज्यात सर्व काही सुरळीत सुरु असल्याचं नमूद केलं.

हेही वाचा: Chandrashekhar Bawankule : छत्रपती सेना ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष; 'असा' आहे बावनकुळेंचा राजकीय प्रवास

दरम्यान, सामनामधून बिनखात्याचे मंत्रिमंडळ अशी टीका केली गेलीय. या प्रश्नावर खासदार विखे पाटील म्हणाले लिहिणारे आत गेले. आता सामनात लिहितं कोण हाच मोठा प्रश्न आहे. खाते वाटप झालेलं नसलं तरी कुणाचंही काम अडलेलं नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोघंही सक्षम नेते आहेत. येत्या १७ तारखेला अधिवेशन असून त्याअगोदर कुठल्याही परिस्थितीत खाते वाटप होईल, असा विश्वास विखे पाटील यांनी व्यक्त केला. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पद काँग्रेसला हवं आहे. त्यामुळं ते मविआपासून नाराज आहेत या प्रश्नावर खासदार विखे पाटलांनी बोचरी टीका केलीय. ते म्हणाले, सगळे एकमेकांना लाचारीनं चिटकलेले आहेत. काँग्रेसचा विषय तर हास्यास्पद वाटतोय. त्यांच्यात महाविकास आघाडी सोडण्याची हिम्मत नाही. एवढं सगळं होऊनही ते बाहेरून पाठिंबा द्यायला तयार आहेत, असं त्यांनी टोला लगावलाय.

हेही वाचा: देशाच्या स्वातंत्र्यात मुस्लिमांचंही योगदान, टिपू सुलतानचं बलिदान विसरू शकत नाही : ओवैसी

Web Title: Bjp Leader Mp Sujay Vikhe Patil Criticizes Congress At Shirdi

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..