nilesh rane
nilesh raneesakal

राणे कुटुंबावर केलेल्या आरोपाचा हिशोब चुकता करणार-निलेश राणे

महाराष्ट्रामध्ये बाकी सगळे प्रश्न सुटले फक्त राणे आणि किरीट सोमय्या एवढेच राहिले.

मालवण (सिंधुदुर्ग) : ठाकरे सरकार (Thackeray Government) हे राणेंना किती घाबरतात हे सध्या सगळ्यांच्या लक्षात आलं आहे. एवढ्या खालच्या थराचे राजकारण आजपर्यंत महाराष्ट्रात (Maharashtra) कोणी केलं नाही आणि कधी यानंतर कोण करेल असं वाटत नाही. पण, ठाकरे विसरले की सातत्याने ते खुर्चीवर बसायला आले नाहीत. खुर्ची आज तुमच्याकडे उद्या आमच्याकडे असेल, लक्षात ठेवा कारण हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे. राणे कु़टुंबावर केलेल्या आरोपाचा हिशोब याच जन्मात चुकता करणार असा इशारा भाजपचे प्रदेश सचिव तथा माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी आज येथे दिला. शिवजयंती (Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti) निमित्त किल्ले सिंधुदुर्गवर (Sindhudurg) आलेल्या राणे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

ते म्हणाले, कुठल्या थराला जाऊन राजकारण करायचं असतं त्याची काहीतरी मर्यादा असली पाहिजे. पण ते ठाकरे सरकार आहे. सगळे मर्यादा विसरले. काही काम केलंच नाही पण, महाराष्ट्रामध्ये बाकी सगळे प्रश्न सुटले फक्त राणे आणि किरीट सोमय्या एवढेच राहिले. बाकी सगळे प्रश्न महाराष्ट्रातील सुटले आहेत असे ठाकरे सरकार वागते आहे. लोक त्यांना आपटल्याशिवाय राहणार नाही आणि हे जे काय चालवलय नोटिसांचे नाटक ते आज ना उद्या संपणार.

Summary

खुर्ची आज तुमच्याकडे उद्या आमच्याकडे असेल, लक्षात ठेवा कारण हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे.

nilesh rane
रश्मी ठाकरे नंतर स्मिता ठाकरे भाजपच्या निशाण्यावर; राणे म्हणाले...

कारण त्यात चुकीचे काहीच नाही. तीन वर्षांची जुनी केस आहे कुणीतरी तक्रार केली. सातत्याने ठाकरे सरकार कोणाला तरी उभं करतं, तक्रारी करायला लावत. पण, खूप तक्रारी आल्या आणि गेल्या राणेंचे काही उखडू शकले नाही, कधी उखडणार नाही. पण आम्ही एक ना एक दिवस उखडायचं कोणाला म्हणतात आणि काय म्हणतात ते आम्ही दाखवून देऊ ठाकरेंना असा इशारा राणे यांनी दिला.

वैभव नाईकांच्यावर निशाणा साधताना राणे म्हणाले, आज राणे केंद्रीय मंत्री आहेत. घटनेने काही अधिकार केंद्र सरकारला दिलेत हे वैभव नाईकांना कदाचित माहीत नसेल. मंत्रिपद खात त्याला फक्त खात माहिती आहे. त्याच्या पलीकडे पोर्टफोलिओ ज्याला म्हणतात आणि मराठीमध्ये ज्याला खात म्हणतात याची वैभव नाईकला काडीची सुध्दा अक्कल नाही. त्यामुळे २०२४ नंतर तो तुम्हाला दिसणार नाही.

केंद्र शासनाकडून विविध यंत्रणांचा वापर करून दुरुपयोग केला जात असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे असा प्रश्न केला असता ते म्हणाले, कुठला दुरुपयोग झाला, कुठे झाला, कोणावर झाला. खुनाच्या आरोपामुळे संजय राठोड यांचे मंत्रिपद गेले. त्यांच्यावर केस झाली नाही. त्याला केंद्र सरकार जबाबदार आहे का? धनंजय मुंडे कुठे-कुठे, किती-किती लग्न करून ठेवली ते त्यांनाच माहीत नाही. त्याला काय केंद्र सरकार जबाबदार आहे का?. कुठल्या गोष्टीला केंद्र सरकार जबाबदार आहे आणि आता हे जे काय चाललंय त्याला कोण जबाबदार आहे असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com