Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंना फटके द्यायला पाहिजेत, निलेश राणेंचा हल्लाबोल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंना फटके द्यायला पाहिजेत, निलेश राणेंचा हल्लाबोल

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंना फटके द्यायला पाहिजेत, निलेश राणेंचा हल्लाबोल

भाजपचे नेते निलेश राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. उद्धव ठाकरेंची अवस्था ही पिसाळलेल्या कुत्र्यासारखी झालीय, पिसाळलेल्या कुत्र्याचं काय करायचं, हे मला वेगळं सांगायची गरज नाही, अशा शब्दांत निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

अमरावतीत शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्यावर बोलताना राणे म्हणाले की, उद्धव ठाकरे असे पिसाळले आहेत की, त्यांना काय करावं हेच सुचत नाहीये आणि पिसाळलेल्या कुत्र्याचं काय करायचं? हे मला वेगळं सांगायची गरज नाही. अशा पिसाळलेल्या लोकांचं काय करायचं, हे मी सकाळीच सांगितलं आहे. ते ठाकरे आहेत. त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर द्यावं लागतं. त्यांच्याविरोधात काही गोष्टी कडकच घेतल्या पाहिजेत असंही ते म्हणालेत. ते सिंधुदुर्गमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

अमरावतीत संतोष बांगर यांच्यावर गाडीवर शिवसैनिकांनी हल्ला केला होता. यावरून दिसतंय ते चांगल्या भाषेत ऐकणार नाहीत, असं दिसतंय. त्यांना फटकेच द्यायला पाहिजेत. त्यांना त्यांच्या भाषेत बोललं पाहिजे कारण त्यांना दुसरी भाषा कळतच नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या पहिल्या भाषणापासून सांगत आहेत की, आमचा संयम तोडू नका. पण जर यांना संयम तोडायचा असेल तर कधी ना कधी दोन हात होणारच. त्यासाठी उद्धव ठाकरेंनी तयार राहावं”, असा धमकीवजा इशाराही निलेश राणे यांनी उद्धव ठाकरेंना दिला आहे.