मुनगंटीवार म्हणतात,शिवसैनिकच होणार मुख्यमंत्री

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 7 November 2019

गडकरी राज्यात कधीच परत येणार नाहीत. शिवसेनेचे आमदार मजबूत आहेत. शिवसेनेचे आमदार कधीच फुटत नाहीत. उद्धवजी हे भाजप आणि शिवसेना सरकारचे मार्गदर्शक आहेत. राज्याला स्थिर सरकार देण्यासाठी आम्ही पाऊले उचलणार आहोत. त्यादृष्टीने आमची चर्चा झाली आहे.

मुंबई : उद्धव ठाकरे म्हणतात, देवेंद्रजी हे शिवसैनिकच आहेत. मग त्यांनी देवेंद्रजींना शिवसेनेचा मुख्यमंत्री समजावे. ते स्वतः त्यांना शिवसैनिक समजतात. भाजप आज राज्यपालांना भेटणार असले तरी सत्तास्थापनेचा दावा करणार नाही, असे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार असे म्हटले आहे.

भाजपचं ठरलं! शिवसेनेशिवाय करणार सत्तास्थापनेचा दावा 

भाजप आणि शिवसेनेमध्ये मुख्यमंत्रीपदावरून वाद सुरु असून, दोन्ही पक्ष मुख्यमंत्रीपदावर ठाम आहेत. आज या दोन्ही पक्षांच्या बैठका होणार असून, अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. सुधीर मुनगंटीवर आणि चंद्रकांत पाटील हे आज दुपारी दोन वाजता राज्यपालंची भेट घेणार आहेत. त्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत मुनगंटीवार यांची भाजपचाच मुख्यमंत्री होईल असे सांगितले.

शिवसेनेचं आज ठरणार; शिवसेनेच्या 'वाघां'ची मातोश्रीवर बैठक

मुनगंटीवार म्हणाले, की गडकरी राज्यात कधीच परत येणार नाहीत. शिवसेनेचे आमदार मजबूत आहेत. शिवसेनेचे आमदार कधीच फुटत नाहीत. उद्धवजी हे भाजप आणि शिवसेना सरकारचे मार्गदर्शक आहेत. राज्याला स्थिर सरकार देण्यासाठी आम्ही पाऊले उचलणार आहोत. त्यादृष्टीने आमची चर्चा झाली आहे. आज आम्ही राज्यपालांची भेट घेणार आहोत. शिवसेनेवर काही स्तरावर चर्चा सुरु आहे. शिवसेनेसोबतच स्थिर सरकार बनवावे अशी आमची इच्छा आहे. भाजपने आजपर्यंत वाट पाहिली आहे. राज्यपालांशी चर्चा करून सत्तास्थापनेबाबत निर्णय घेऊ. येणाऱ्या काही दिवसांत योग्य निर्णय होणार आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची विरोधात बसण्याची भूमिका आहे. भाजप अल्पमतातील सरकार बनविणार नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP leader Sudhir Mungantiwar talked about Devendra Fadnavis as CM