Sharad Pawar: 'बैठक घेऊन पवारांना थोडं समजून घेतले पाहिजे', उदयनराजेंचा मिश्किल टोला

अदानींच्या चौकशीवरुन आरोप प्रत्यारोप सुरू असतांना शरद पवारांच्या व्यक्तव्यावरून वातावरण तापलं
Sharad Pawar
Sharad PawarEsakal

गौतम अदानी यांच्या चौकशीच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या व्यक्तव्यानंतर आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत वेगळी मते असल्याचे दिसून येत आहे. गौतम अदानी यांची जेपीसी चौकशी व्हावी अशी मागणी केली जात आहे. ही मागणी काँग्रेससह, ठाकरे गटाकडून केली जात आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी वेगळीच भूमिका घेतली.

गौतम अदानी यांची न्यायालयीन चौकशी व्हावी असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे. त्यानंतर संपूर्ण राज्यांमध्ये शरद पवारांनी एक प्रकारे गौतम आदमी यांची बाजू घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. त्यावरून वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील येऊ लागल्या आहेत. त्यावर खासदार उदयनराजे भोसले यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

खासदार उदयनराजे भोसले प्रतिक्रिया देताना मिश्किलपणे म्हणाले की, शरद पवार साहेब यांच्या बरोबर बैठक घ्यायची आहे. त्यांच्याकडून समजून घेतलं पाहिजे. सर्व उद्योजकांनी टाटा ग्रुपचे अनुकरण करायला पाहिजे असं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केलं आहे.

Sharad Pawar
Narayan Rane: राणेंचं मंत्रिपद जाण्याच्या सुरू होत्या चर्चा; PM मोदी म्हणतात, "संघर्षातून..."

गेल्या काही दिवसांपासून गौतम अदानी यांच्या विरोधात भाजपा विरोधक पक्ष टीका करत असतानाच यासंबधी त्यांची चौकशी करावी अशी मागणी करत असतांना शरद पवार यांनी वेगळं मत व्यक्त केल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. त्यावरच उदयनराजे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

काँग्रेससह प्रमुख विरोधी पक्षांनी अदानी प्रकरणात जेपीसीची मागणी केली होती. मात्र शरद पवारांनी मात्र या मागणीला विरोध दर्शवला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीतून शरद पवारांनी एकप्रकारे गौतम अदाणी यांचं समर्थन केल्याचं दिसून येत आहे. पवार यांनी संयुक्त संसदीय समितीऐवजी सर्वोच्च न्यायालयाच्या समितीमार्फत अदानी प्रकरणी चौकशी करावी, असं विधान केलं होतं.

Sharad Pawar
Sharad Pawar: "पदवीचं काय घेऊन बसलात ?" अदानीच्या पाठोपाठ मोदींच्या समर्थनार्थ पवारांची बॅटिंग!

तसेच हिंडेबनर्ग रिपोर्टवरुनही शरद पवार यांनी महत्वाचे विधान केलं होतं. "त्या कंपनीची पार्श्वभूमी काय माहिती नव्हतं. अशा विषयावर देशात गदारोळ झाला तर त्याची किंमत देशाच्या अर्थव्यवस्थेला भोगावी लागते, हे दुर्लक्षित करता येणार नाही. हिंडेनबर्ग अहवालात अदाणींना लक्ष्य करण्यात आलं असं दिसतं," असं म्हणत शरद पवारांनी काँग्रेसच्या भूमिकेला विरोध दर्शवला होता.

Sharad Pawar
Abdul Sattar: ...म्हणून अब्दुल सत्तार अयोध्येला गेले नाहीत, कारणं आलं समोर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com