Vinod Tawde mother Vijaya Sridhar Tawde
Vinod Tawde mother Vijaya Sridhar Tawde

विनोद तावडे यांच्या आईचे निधन, मुंबईत घेतला अखेरचा श्वास!

Published on

भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांच्या आई विजया श्रीधर तावडे यांचे निधन झाले आहे. मुंबईत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दीर्घ आजाराने त्यांचे निधन झाले. त्यांनी मुंबईत अखेरचा श्वास घेतला. 

विजया तावडे यांचे आज सायंकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ८५ वर्षांच्या होत्या. उद्या सकाळी ९ वाजता अमृत एन्क्लेव्ह, नेहरू रोड, विलेपार्ले पूर्व येथील निवासस्थानाहून त्यांची अंत्ययात्रा निघेल. त्यांच्या पश्चात विनोद यांच्यासह उद्योजक पुत्र विलास, विवेक ही मुले, कन्या जयश्री कदम, सामाजिक कार्यकर्त्या स्नुषा वर्षा तावडे आणि बराच मोठा आप्त परिवार आहे.

यासंदर्भात स्वतः विनोद तावडे यांनी ट्विट करून माहिती दिली आहे. ते म्हणाले, "आपल्याला कळविण्यास अत्यंत दु:ख होत आहे की, माझी आई विजया श्रीधर तावडे यांचे दीर्घ आजाराने मुंबई येथे निधन झाले."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com