Javed Akhtar : "ही खरी ५६ इंचाची छाती, भाजप नेत्यांनी जावेद अख्तरांचे अभिनंदन करावे" | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Javed Akhtar - Uddhav Thackeray

Javed Akhtar News: "ही खरी ५६ इंचाची छाती, भाजप नेत्यांनी जावेद अख्तरांचे अभिनंदन करावे"

Mumbai News: जावेद अख्तर नुकतेच पाकिस्तानला गेले. यावेळी त्यांनी 2008 च्या हल्ल्यात सहभागी असलेल्या पाकिस्तानने दहशतवाद्यांना मदत केल्याचा आरोप केला आणि पाकिस्तानने आपली परिस्थिती सुधारली नाही तर त्यांना आणखी वाईट दिवस येऊ शकतात, असा इशारा देखील दिला. दरम्यान पाकिस्तानी कलाकार जावेद अख्तर यांच्यावर टीका करत आहेत. जावेद अख्तरचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय राहिला आहे. 

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजप नेत्यांनी जावेद अख्तर यांचं अभिनंदन करावे, अशी मागणी केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, राजनाथ सिंह, अमित शाह यांनी जावेद अख्तर यांचे अभिनंदन करावे. सर्जिकल स्ट्राईक झाल्यावर भाजपच्या लोकांनी फटाके वाजवले, जसे पाकिस्तान जगाच्या नकाशावरून नष्ट झाला. मात्र जावेद अख्तर यांनी पाकिस्ताना जाऊन त्यांच्या तोंडावर जी धूलाई केली. त्याला हिंमत लागते. त्यामुळे देशातील सर्व राजकीय पक्षांनी जावेद यांच्या हिंमतीला दाद द्यावी, असे संजय राऊत म्हणाले.

भाजपने  जावेद अख्तर यांच्यावर नेहमी टीका केली. त्यांना पाकिस्तानमध्ये जा, असा इशारा दिला. मात्र पाकिस्तानमध्ये जाऊन टीका करणे याला या ५६ इंचाची छाती लागते. 

टॅग्स :Sanjay Rautjaved akhtar