Jaykumar Gore : गोरेंच्या वडिलांकडून घातपाताचा संशय; उपस्थित केले महत्त्वाचे मुद्दे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jaykumar Gore

Jaykumar Gore : गोरेंच्या वडिलांकडून घातपाताचा संशय; उपस्थित केले महत्त्वाचे मुद्दे

पुणेः नागपुरातील अधिवेशन (Nagpur Winter Session) आटोपून पुण्यातून माण इथं जात असलेले आमदार जयकुमार गोरे यांची गाडी बाणगंगा नदीच्या पात्रात कोसळल्याने आमदार जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांच्यासह अन्य तिघेजण जखमी झाले आहेत.

मात्र या अपघातानंतर जयकुमार गोरे यांच्या वडिलांनी घातपाताचा संशय व्यक्त केलाय. वडील भगवान गोरे यांनी रुग्णालयात जात जयकुमार यांची रुग्णालयात जावून भेट घेतली.

हेही वाचाः Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

भगवान गोरे म्हणाले की, अपघात झाला त्यावेळी पुलावर वाहतूक नव्हती. अपघाताच्या ठिकाणी मी गेलो होता, तिथे अपघात होण्यासारखं काही नाही. पुलाचा कठडा तोडून गाडी गेली कशी? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

विशेष म्हणजे फलटणमध्येच हे घडतंय म्हणून मला शंका आहे, माझा कुणावरही संशय नाही, असं भगवान गोरे म्हणाले. जयकुमार गोरे यांच्यावर पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात उपचार सुरु आहे.

दरम्यान, आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी जयकुमार गोरे यांची भेट घेतली. भेटून बाहेर आल्यानंतर सावंत म्हणाले, "आता आमदारांची प्रकृती स्थिर आहे. त्यांना कोणताही धोका नाही. गोरे माझ्या सोबत बोलले आमच्यात चर्चा देखील झाली पाच सहा दिवसांनंतर ते ICU मधून बाहेर येतील अशी माहिती तानाजी सावंत यांनी दिली.

टॅग्स :BjpaccidentJaykumar Gore