kirit Somaiya Video : एक जायेगा तो सब जायेंगें...; किरीट सोमय्या व्हायरल व्हिडीओ प्रकरणी भाजप नेत्याचं सूचक विधान

BJP MLA Nitesh Rane On BJP Leader kirit somaiya Viral video Case MP Criticize Sanjay Raut
BJP MLA Nitesh Rane On BJP Leader kirit somaiya Viral video Case MP Criticize Sanjay Raut

नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे गटाते नेते खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. गुन्हेगारांना फिरवणं, बरोबर ठेवणं याबद्दल सामनातून टीका होतेय हे हास्यास्पद असून भाजपवर टीका करत असाल तर तुमच्या मालकाच्या मांडीलाजमांडी लागून गुन्हेगार बसले आहेत, त्यांना काय दुधाने आंघोळ घातली आहे का? असा प्रश्न नितेश राणेंनी विचारला. यासोबतच राणे यांनी किरीट सोमय्यांच्या कथित आक्षेपार्ह व्हिडीओबाबत देखील सूचक विधान केलं आहे.

राणे पुढे बोलताना म्हणाले की, निलेश पराडकर कोण आहे? हा राऊतांच्या बाजूला बसला आहे. याचे माझ्याकडे फोटो आहेत. हा निलेश पराडकर किती मोठा संत आहे याचा तपास केला तेव्हा याच्यावर असलेल्या गुन्ह्याची यादी सापडली. त्याच्यावर ३०२, ३०७, खंडणी, अपहरण असे गुन्हे आज पण आहेत.

मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर जो शिवाजीपार्क येथे हल्ला झाला त्यामध्ये निलेश पराडकर याला मुंबई पोलिस शोधत आहेत. तो नेमका कुठे आहे, त्याला कोणी कुठे ठेवलंय याचं उत्तर राऊत आणि त्यांचे मालक देऊ शकतात.माझ्या माहितीनुसार ह्या लोकांनी त्याला लपवलं आहे.

BJP MLA Nitesh Rane On BJP Leader kirit somaiya Viral video Case MP Criticize Sanjay Raut
Kirit Somaiya Viral Video: 'मी कोणत्याही महिलेवर अत्याचार केलेला नाही'; कथित व्हिडीओ प्रकरणी सोमय्यांची चौकशीची मागणी

तुमच्या मांडीला-मांडी लावून बसलेले गुंड त्यांना तुम्ही पदं देऊन ठेवले आहेत. मग तुम्ही कुठल्या तोंडाने दुसऱ्यावर आरोप करता. ठाकरे ड्रायक्लीनींग कंपनीत ह्याला धुवून बाजूला बसवलं आहे का? याबद्दल सामनामध्ये अग्रलेख लिहीण्याची हिंमत संजय राऊत यांनी दाखवावी असेही नितेश राणे यावेळी म्हणाले.

BJP MLA Nitesh Rane On BJP Leader kirit somaiya Viral video Case MP Criticize Sanjay Raut
Monsoon Session 2023 : '...तर सभागृहात पुरावे देणार'; सोमय्यांच्या व्हायरल व्हिडीओ प्रकरणी विरोधक आक्रमक

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांचा कथित आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाला त्याबद्दल विचारले असता राणे म्हणाले की, सत्या चित्रपटातील एक डायलॉग आहे, अपने धंदे में एक जायेगा तो सब जायेंगें. हे फक्त काढणाऱ्या लोकांनी लक्षात ठेवावं. हमाममध्ये सगळे नंगे असतात. तपासाची मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे. त्यानुसार तपास झाल्यावर सत्यता बाहेर येईल त्यानंतर त्याविषयी बोलू असेही नितेश राणे म्हणाले.

दरम्यान किरीट सोमय्या यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून या व्हायरल व्हिडीओ प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

BJP MLA Nitesh Rane On BJP Leader kirit somaiya Viral video Case MP Criticize Sanjay Raut
NDA Meeting : 'भाजपने दिलेल्या वागणूकीमुळे आम्ही शहाणे झालो, आता…'; NDA बैठकीला न बोलवल्याने मित्रपक्ष नाराज

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com