"गोळ्या घ्यायच्या होत्या अन् नाश्ता...", मारहाण केलीच नसल्याचा आमदार कांबळेंचा दावा, Viral Video नंतर दिलं स्पष्टीकरण

भाजप आमदारा सुनील कांबळे यांचा एका पोलीस शिपायाला कानाखालीमारल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. या नंतर आमदार कांबळे यांनी त्यांची व्हिडीओबद्दलची भूमिका स्पष्ट केली आहे.
bjp mla sunil kamble explanation on slapping police officer Video and ncp jitendra satav sassoon hospital
bjp mla sunil kamble explanation on slapping police officer Video and ncp jitendra satav sassoon hospital

भाजप आमदार सुनील कांबळे यांनी पोलीस शिपायाच्या कानशिलात लगावल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. यापूर्वी आज सकाळी कांबळे यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याला देखील कानाखाली लगावल्याचा आरोप होतोय. या दोन्ही घटनेनंतर कांबळे यांच्यावर विरोधी पक्षातील नेत्यांकडून जोरदार टीका केली जात आहे. यादरम्यान कांबळे यांनी आपण कोणाच्याही कानाखाली मारली नाही असे म्हटलं आहे.

कांबळे यांनी पोलिस शिपायाला कानाखाली मारल्याचा व्हिडीओ समोर आला असून यानंतर भाजप आमदार कांबळे टीकेची झोड उठवली जातेय. याबद्दल विचारले असता, सुनील कांबळे म्हणाले की, मी कार्यक्रमातून जेव्हा बाहेर पडलो, सकाळी लवकर उठल्याने नाश्ता झाला नव्हता. गोळ्या घ्यायच्या होत्या. त्यामुळे घाई गडबडीत बाहेर पडलो. पण इथे आल्यावर हे सगळं लाईव्ह सुरू असल्याचं मला माहिती झालं. काय झालं हेच मला कळलं नाही. मी कोणाला मारहाण करण्याचा काही संबंध नाही. त्याला मी का मारेल. माझा त्याचा परिचय किंवा काही वाद नाही. मी कोणाच्या कानाखाली मारली नाही.

कांबळे पुढे म्हणाले की, मी स्टेजवरून उतरत असताना तो आडवा आला, मी त्याला ढकलून बाजूला झालो. वाद झाला असता तर मी तीथं थांबलो असतो. मी लगेच बाजूला झालो, असेही कांबळे यावेळी म्हणाले.

bjp mla sunil kamble explanation on slapping police officer Video and ncp jitendra satav sassoon hospital
Ship Hijacked Near Somalia : सोमालियाजवळ जहाज 'MV LILA NORFOLK' हायजॅक, क्रू मेंबर्समध्ये 15 भारतीयांचा समावेश

व्हिडीओमध्ये कानाखाली मारताना तुम्ही दिसत आहात, असे विचारले असता कांबळे म्हणाले की, तुम्हीच तो व्हिडीओ पाहा आणि काय झालं याची खात्री करा. कानाखाली मारण्याची पोझिशन काय असते आणि व्हिडीओमध्ये काय झालं ते पाहा असंही त्यांनी सांगितलं

राष्ट्रावादीच्या पदाधीकाऱ्यांला देखील कानाखाली मारली असा आरोप होतोय, याबद्दल विचारल्यावर कांबळे म्हणाले की, त्यांनी आरोप केला असेल. पण मी रुपाली चाकणकर यांच्यासोबत चाललो होतो. त्यांनी सांगितलं की आमदारांना पुढे येऊ दे म्हणून, तरी तो धक्का देत होता. तेव्हा सिव्हीलमधील पोलिसांनी त्याला बाजूला केलं. त्यानंतर काय झालं, मला माहिती नाही. मी कोणाला मारलं नाही, असेही कांबळे यावेळी म्हणाले.

bjp mla sunil kamble explanation on slapping police officer Video and ncp jitendra satav sassoon hospital
Ajit Pawar: अजित पवार यांच्या उपस्थितीत भाजप आमदाराची राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यास मारहाण

दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावर आहेत. आज सकाळपासून ते विविध विकास कामांची पाहणी करत आहेत. तसेच यावेळी त्यांनी ससून रुग्णलयातील तृतीय पंथीय वार्डाचे उद्घाटन केले. या कार्यक्रमावेळी अजित पवार, हसन मुश्रीफ, सुनील तटकरे आणि रुपाली चाकणकर इत्यादी नेते देखील उपस्थित होते. यावेळी या कर्यक्रमानंतर सुनील कांबळे यांनी बाहेर पडताना पायऱ्यांवर पोलीस शिपायावर हात उचलल्याचा प्रकार व्हिडीओत कैद झाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com