Mohit Kamboj| मोहित कंबोज यांनी उद्धव ठाकरेंना डिवचलं, पाहा काय आहे प्रकरण? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

BJP Mohit kamboj On Shivsena Uddhav Thackeray

मोहित कंबोज यांनी उद्धव ठाकरेंना डिवचलं, पाहा काय आहे प्रकरण?

भाजप नेते मोहित कंबोज यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पुन्हा डिवचलं आहे. यापूर्वी, कंबोज यांनी सध्या राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरलेला दहशतवादी याकूब मेमनच्या कबरीवरून त्यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला होता.(BJP Mohit kamboj On Shivsena Uddhav Thackeray)

कंबोज यांनी ट्विट करत यंदा महाराष्ट्रातील १२ कोटी जनतेला ना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या ना दहीहंडी उत्सवाच्या असे म्हणत उद्धव ठाकरेंना डिवचले आहे.

काय म्हटले आहे मोहित कंबोज यांनी ट्विटमध्ये?

यंदा महाराष्ट्रातील १२ कोटी जनतेने ना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या ना दहीहंडी उत्सवाच्या. 12 कोटी जनतेला अडीच वर्षात सण साजरे करता आले नाहीत. मात्र, यंदा शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात हिंदूंना सण मोठ्या उत्साहात साजरा करता आला. याबद्दाल शिंदे-फडणवीस सरकारचे आभार.

अशा आशयाचे ट्विट करत मोहित कंबोज यांनी उद्धव ठाकरेंना डिवचले.

यापूर्वी, मोहित कंबोज यांनी याकूब मेमनवरुन निशाणा साधला होता. दसऱ्याच्या आधी उद्धव ठाकरेंना याकूब मेमनच्या कबरीला मजार बनवण्याचं कारण जनतेला द्यावं लागेल, असं मोहित कंबोज म्हणाले आहेत. त्यामुळे आता या सगळ्या उद्धव ठाकरे आणि शिवसेना काय उत्तर देणार हे पाहाणं महत्वाचं असेल.

Web Title: Bjp Mohit Kamboj On Shivsena Uddhav Thackeray

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..