Mohit Kamboj: राष्ट्रवादीचं नाव घेत,मोहीत कंबोजांचा उद्धव ठाकरेंना टोला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mohit Kamboj

Mohit Kamboj: राष्ट्रवादीचं नाव घेत,मोहीत कंबोजांचा उद्धव ठाकरेंना टोला

Uddhav Thackeray: भाजप नेते मोहित कंबोज यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पुन्हा डिवचलं आहे. यापूर्वी, कंबोज यांनी सध्या राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरलेला दहशतवादी याकूब मेमनच्या कबरीवरून त्यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला होता. कंबोज यांनी ट्विट करत यंदा महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेला ना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या ना दहीहंडी उत्सवाच्या असे म्हणत उद्धव ठाकरेंना डिवचले होते.

तर यापूर्वी, मोहित कंबोज यांनी याकूब मेमनवरुन निशाणा साधला होता. दसऱ्याच्या आधी उद्धव ठाकरेंना याकूब मेमनच्या कबरीला मजार बनवण्याचं कारण जनतेला द्यावं लागेल, असं मोहित कंबोज म्हणाले होते. तर पुन्हा कंबोज यांनी ट्विट करत उद्धव ठाकरे यांच्यावर निशाना साधला आहे.

कंबोज ट्विट मध्ये म्हणाले की "काँगेस पक्ष आहे, परंतु त्यांना अध्यक्ष, तर उद्धवजी अध्यक्ष आहेत पण त्यांचा पक्ष नाही, आणि राष्ट्रवादीचे बघूया! असं ट्विटमध्ये कंबोज म्हणाले. कंबोज वारंवार शिवसेना आणि राष्ट्रवादीला डिवचण्याचे काम करत आहे. याअगोदर रोहित पवारांच्या बारामती अॅग्रो मध्ये भ्रष्टाचाराची पोलखोल करणार आसल्येचे त्यांनी ट्विट करून सांगितले होते. त्यामुळे आता टीकेला उद्धव ठाकरे आणि शिवसेना काय उत्तर देणार हे पाहाणं महत्वाचं असेल.