''शरद पवारांसारखा नेता राष्ट्रपती झाल्यास देशात दहशतवाद वाढेल'' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

''शरद पवारांसारखा नेता राष्ट्रपती झाल्यास देशात दहशतवाद वाढेल''

''शरद पवारांसारखा नेता राष्ट्रपती झाल्यास देशात दहशतवाद वाढेल''

नवी दिल्ली : भाजपचे खासदार दिलीप घोष यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्याविरोधात वादग्रस्त विधान (Controversy) केलं आहे. काही दिवसांपूर्वी घोष यांनी पवारांचे दहशतवाद्यांशी संबंध असल्याचे म्हटले होते. त्यानंतर आता पवारांसारखे राष्ट्रपती आपल्या देशाला मिळाल्यास दहशतवाद वाढेल असे विधान केलं आहे. यावेळी त्यांनी ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्यावरही निशाणा साधला. घोष यांच्या या विधानानंतर देशासह राज्यातील राजकीय वादाला नवं तोंड फुटण्याची शक्यता आहे. (BJP Dilip Ghosh Controversial Statement On Sharad Pawar)

हेही वाचा: राष्ट्रपती निवडणूक : पवारांच्या भूमिकेबाबत फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

घोष म्हणाले की, 'दीदींना वाटतं की, सगळ्यांनी पवारांशी एकदा बोललं तर ते राष्ट्रपती पदासाठी मान्य होतील. मात्र, याबाबत कुणीच बोलायला तयार नसल्याचे ते म्हणाले. काल राष्टपती निवडणुकीबाबत चर्चा करण्यासाठी ममतांनी सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठक बोलावली होती. यामध्ये 16 पक्ष सहभागी झाले होते.

राष्ट्रपती पदासाठी इच्छूक नाही - पवार

दरम्यान, येत्या 18 जुलै रोजी राष्ट्रपतीपदासाठी (Presidential Election) निवडणूक पार पडणार असून, राष्ट्रपती पदासाठी आपण इच्छूक नसल्याचे शरद पवार यांनी यापूर्वी जाहीर केले आहे. तसेच कालच्या बैठकीतदेखील शरद पवार यांना विरोधी पक्षांकडून आलेली राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराची ऑफर त्यांनी नाकारली आहे. "मी अजून राजकारणात सक्रिय आहे." असं सांगत ही ऑफर त्यांनी नाकारली.

पवारांनंतर नव्या नावाची चर्चा

राष्ट्रपतीपदाची उमेदवारी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी नाकारल्यानंतर आता विरोधीपक्षांकडून दुसऱ्या व्यक्तीचा शोध घेतला जात आहे. पण ही व्यक्ती सर्व विरोधीपक्षांच्या संमतीनं निवडण्यात येणार आहे. दिल्लीत विरोधी पक्षांची बैठक पार पडली. यामध्ये काँग्रेससह १७ पक्षांनी सहभाग घेतला. यामध्ये हा ठराव करण्यात आला आहे.

हेही वाचा: भाजपकडून लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू; 'मिशन 48'ची घोषणा

ममतांच्या बैठकीला अनेक पक्षांची पाठ

दरम्यान, काल ममतांनी बोलावलेल्या तृणमुल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी बोलावलेल्या या विरोधीपक्षांच्या बैठकीत १७ राजकीय पक्षांनी सहभाग नोंदवला होता. यामध्ये काँग्रेस, समाजवादी पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, द्रमुक, राष्ट्रीय जनता दल आणि डाव्या पक्षांचे नेतेही सहभागी झाले होते. तर आम आदमी पार्टी, तेलंगाणा राष्ट्र समिती, बिजू जनता दल हे या बैठकीपासून दूर राहिले. तर शिवसेना, भाकपा, माकपा, नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपी, राष्ट्रीय लोकदल, झारखंड मुक्ती मोर्चा या पक्षांचे नेते या बैठकीत सामिल झाले होते.

Web Title: Bjp Mp Dilip Ghosh Slams Ncp Leader Sharad Pawar On Presidential Election Name

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top