भाजप खासदाराने केली ठाकरे सरकारची पाठराखण

सकाळ वृत्तसेवा
Friday, 11 September 2020

राज्यातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येसंदर्भात आपण राज्य सरकारवर टीका करीत नाही असं म्हणताना भाजप खासदाराने ठाकरे सरकारची पाठराखण केली.

मुंबई - राज्यातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येसंदर्भात आपण राज्य सरकारवर टीका करीत नाही. उलट सर्वांनीच सरकारचे नियम पाळले पाहिजेत. राज्याला प्रगतिपथावर नेण्यासाठी आपण सर्व नागरिकांनी तसेच सरकारनेही प्रयत्न केले पाहिजेत. हे सर्वांचेच काम आहे, अशा शब्दांत भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी सरकारवर टीका न करता त्यांची पाठराखण केली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या संदर्भात शेट्टी यांनी समाजमाध्यमांवर व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे.  चाचण्यांची संख्या वाढत असल्याने आता रुग्णसंख्या वाढलेली दिसते आहे. तरीही अशा स्थितीत राज्य सरकारने लॉकडाउन उठवावा, असेही त्यांनी म्हटले आहे. कोरोनाचा एकही रोगी शिल्लक राहणार नाही, अशी अवस्था जगात कोठेही केव्हाही येणार नाही. त्यामुळे आता लोकांना फार काळ घरात डांबून न ठेवता सरकारने आपले काम केले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP MP follows to Thackeray government