
गद्दारांना तू धडा शिकवणार होय? म्हणत नारायण राणेंनी आदित्य ठाकरेंना फटकारलं
मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची आज घेतलेल्या मुलाखतीवर अनेक नेत्यांकडून टीका करण्यात येत असून, आज केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी देखील ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. यावेळी त्यांनी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्यावर देखील हल्लाबोल केला.
नारायण राणे म्हणाले की, "एका बाजूला पदावरून खाली उतरतो, दुसऱ्या बाजूला युवराज आदित्य ठाकरे व्हिक्टरी दाखवतात, बॅक टू द पव्हेलियन.. मातोश्रीत आलात व्हिक्टरी.. अरे मुख्यमंत्री पद गेलं आणि व्हिक्टरी काय. आदित्य काय करतात आणि उद्धव काय करतात काही मेळ नाही. महाराष्ट्रभर यात्रा गद्दारांना धडा शिकवा.. कोण शिकवणार? तू शिकवणार? नाक पुसायला येतो का?" अशा खोचक शब्दात त्यांनी शिवसेना नेते आदित्य ठाकरें यांना खडे बोल सुनावले.
हेही वाचा: मंकीपॉक्सच्या संकटादरम्यान आदर पूनावालांचे लसीबद्दल वक्तव्य, म्हणाले...
नारायण राणे पुढे म्हणाले की, "कोण आहे हा आदित्य.. आम्ही नाव घेत नाही, जाऊद्या आमच्यासमोर वाढलेला मुलगा आहे. काहीही बोलतो, कोणालाही गद्दला. शिवसैनिक गद्दार? साहेबांनी वाढवलेले शिवसैनिक गद्दार? कोण ऐकून घेईल, आता प्रोटेक्शन आहे म्हणून हे सुचतंय, थोड्यादिवसांनी ते पण जाईल, एकटं फिरायला लागेल तेव्हा घरातून बाहेर पडणार नाही तू , तोंड बंद कर तुला महाराष्ट्र अजून कळला नाही, देश तर सोडाच..." अशा शब्दात नारायण राणे यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला.
हेही वाचा: अजित पवारांच्या सर्वच प्रश्नांना फडणवीसांचे उत्तर, म्हणाले..
Web Title: Bjp Narayan Rane Critisize Aditya Thackeray Shiv Sanwad Yatra Maharashtra Politics
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..