Sharad Pawar News : शरद पवारांनी कर्नाटकप्रश्नी मार खाल्ल्याचे पुरावे द्या!; निलेश राणेंची मागणी

Bjp nilesh rane questions sharad pawar 1986 agitation in belgaon Maharashtra karnataka border dispute
Bjp nilesh rane questions sharad pawar 1986 agitation in belgaon Maharashtra karnataka border dispute Esakal

सध्या महाराष्ट्र-कर्नाटक या दोन राज्यातील सीमाप्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. हा सीमावाद मागच्या ६०-६५ वर्षांपासून सुरू असून जेव्हा संयुक्त महाराष्ट्राच्या लढा सुरु होता तेव्हा दोन राज्यांमध्ये तणावाचं वातावरण होतं. महाराष्ट्रातील नेत्यांना कर्नाटकामध्ये जाण्यास बंदी होती. यावेळी शरद पवारांनी युक्ती करुन आंदोलनस्थळ गाठलं होतं. यावेळी शरद पवार यांनी मारही खाल्ला होता.

शिंदे फडणवीस सरकारमधील मंत्र्यांना बेळगावमध्ये जाण्यास कर्नाटक सरकारची परवानगी न मिळाल्याने त्यांचा दौरा स्थगित करण्यात आला, त्यानंतर शरद पवारांनी १९८६ मध्ये बेळगावमध्ये गुपचूप जाऊन केलेल्या आंदोलनाची चर्चा होतेय. दरम्यान भाजपचे नेते निलेश राणे यांनी शरद पवार यांनी कर्नाटक सीमाप्रश्न प्रकरणात पोलिसांकडून मार खाल्ला याबद्दल संशय व्यक्त करत पुराव्याची मागणी केली आहे.

हेही वाचा - शेतमजूर ते कॅनाॅल मॅन...जाणून घ्या एक यशोगाथा....

"पवार साहेबांनी महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डर प्रकरणात 1986 ला पोलिसांकडून मार खाल्ला याचा कोणीतरी पुरावा मला पाठवा. मिळत नाहीये." असं ट्विट त्यांनी केलं आहे.

Bjp nilesh rane questions sharad pawar 1986 agitation in belgaon Maharashtra karnataka border dispute
Sharad Pawar : कर्नाटक वादावर शरद पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, मुख्यमंत्री...

राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी सोशल मिडीयावर पोस्ट लिहीली आहे. या पोस्टमध्ये खासदार सुळे यांनी कर्नाटक सरकारने बंदी घातल्यानंतर देखील शरद पवार यांनी बेळगावात जाऊन आंदोलन केले यावेळी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या गेल्या तसेच शरद पवार, बाबासाहेब कुपेकर, आदींना पोलिसांनी बेदम मारहाण केली, अशी माहिती दिलीय.

Bjp nilesh rane questions sharad pawar 1986 agitation in belgaon Maharashtra karnataka border dispute
Gujrat Exit Polls 2022 : मागच्या दोन निवडणुकांत एक्झिट पोल कसे होते? वाचा भाकितं किती ठरली खरी

सुप्रिया सुळे यांनी लिहीलं की, "कर्नाटक-महाराष्ट्रादरम्यान पुन्हा एकदा सीमावाद सुरू झाला असताना महाराष्ट्रातील मंत्र्यांचा बेळगाव दौरा कर्नाटकच्या तंबीनंतर रद्द करण्यात आला. ही बातमी वाचली आणि मला शरद पवारांच्या ऐंशीच्या दशकातील आंदोलनाची आठवण झाली. त्यांनी कर्नाटकमध्ये जाऊन पोलीसांच्या लाठ्या झेलल्या, पण माघार घेतली नाही. खुद्द एस एम जोशी देखील शरद पवारांच्या पाठीवर उमेटलेले वळ पाहून हळहळले होते", या सोबत सुप्रिया सुळे यांनी तेव्हाचे शरद पवार यांचे फोटो देखील शेअर केले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com