चंद्रकांत पाटलांची गाडी अडवण्याचा प्रयत्न; कार्यकर्ते आक्रमक

युवराज धोतरे 
बुधवार, 2 ऑक्टोबर 2019

वाट काढून प्रदेशाध्यक्ष पुण्याकडे...
आमदार भालेराव समर्थकांचा गोंधळ पाहून पोलीस बंदोबस्तात त्यातून वाट काढत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील हे पुण्याकडे रवाना झाले आहेत. थोड्याच वेळात दुसरी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर होणार असल्याने यामध्ये आमदार भालेराव यांचे नाव आहे किंवा नाही याकडे उदगीरकर यांचे लक्ष लागले आहे.

उदगीर : भाजपाची पहिली 125 जणांची उमेदवारी यादी जाहीर झाली असून त्यामध्ये उदगीर विधानसभा मतदार संघाचा समावेश नाही  त्यामुळे उदगीरचे विद्यमान आमदार सुधाकर भालेराव यांची उमेदवारी डावलली गेल्याच्या कारणावरून बुधवारी (ता 2) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या घरासमोर उदगीर मतदारसंघातल्या शंभराच्यावर कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला आहे.

गेल्या अनेक दिवसापासून उदगीरचे विद्यमान आमदार भालेराव यांचा पत्ता कट होणार अशी चर्चा मतदारसंघात सुरू होती. दोन दिवसापूर्वी आमदार भालेराव यांना फोनवरून तुमची उमेदवारी रद्द झाली आहे कोणाला द्यायची हे नाव सुचवा असा प्रदेश कार्यालयातून फोन आल्याची चर्चा सुरू झाली होती. त्यातच काल भाजपची पहिली यादी जाहीर झाली आणि त्यात उदगीरचा समावेश नसल्याने संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी आज मुंबई घातली आहे.

मुंबईला गेल्यानंतर कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना भेटण्यासाठी निवासस्थानी गेले. मात्र त्यातील तिघा-चौघांना निवासस्थानात प्रवेश देण्यात आला बाकी कार्यकर्ते बाहेर उभारून होते. लगेच चंद्रकांत पाटील पुण्याकडे रवाना होण्यासाठी निघाले असता त्यांची गाडी या संतप्त कार्यकर्त्यांनी अडवून गोंधळ घातला व आमदार भालेराव यांनाच उमेदवारी देण्याची मागणी त्यांनी या वेळी प्रदेशाध्यक्षकडे केली.
यामध्ये उदगीरचे नगराध्यक्ष बसवराज बागबंदे, उपाध्यक्ष सुधीर भोसले, तालुकाध्यक्ष वसंत शिरसे, नगरसेवक सावन पस्तापुरे, तालुका सरचिटणीस लक्ष्मण जाधव, शंकर रोडगे, धर्मपाल नादरगे, प्रकाश राठोड यांच्यासह शंभर ते दीडशे कार्यकर्ते उपस्थित असल्याची माहिती आहे.

वाट काढून प्रदेशाध्यक्ष पुण्याकडे...
आमदार भालेराव समर्थकांचा गोंधळ पाहून पोलीस बंदोबस्तात त्यातून वाट काढत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील हे पुण्याकडे रवाना झाले आहेत. थोड्याच वेळात दुसरी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर होणार असल्याने यामध्ये आमदार भालेराव यांचे नाव आहे किंवा नाही याकडे उदगीरकर यांचे लक्ष लागले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP party Workers agitation on front of Chandrakant Patil in Mumbai