J.P. Nadda : जे.पी. नड्डा 'दर्गा'मध्ये गेल्याने वातावरण पेटलं; विरोधक म्हणाले... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

jp nadda

J.P. Nadda : जे.पी. नड्डा 'दर्गा'मध्ये गेल्याने वातावरण पेटलं; विरोधक म्हणाले...

चंद्रपूरः भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. या सभेनंतर नड्डा पोहोचले ते थेट दर्ग्यात. त्यामुळे राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप होत आहेत.

चंद्रपुरातील बाबतुल्ला शाह दर्ग्याला जेपी नड्डा यांनी भेट घेतली. तिथे त्यांनी चादरदेखील चढवली. यावेळी दर्गा प्रशासनाच्या वतीने त्यांचं स्वागत करण्यात आलं. मात्र विरोधकांच्या वतीने टीका करण्यात येत आहे.

काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी भाजपला चिमटे काढले आहेत. हा देश सर्वधर्मसमभाव मानणारा आहे, हे भाजपला मान्य करावेच लागेल. परंतु त्यांनी मनातून हे केलं पाहिजे, असं सावंत म्हणाले.

दरम्यान, चंद्रपुरातील सभेत बोलतांना नड्डा म्हणाले की, मंदीच्या दिवसातही भारताची अर्थव्यवस्था चांगली आहे. आज अमेरिका आणि रशिया संकटातून जात आहे. पण भारत अर्थव्यवस्था स्थिर करण्याचा प्रय़त्न करत आहे. आज आपण स्टीलमध्ये जगात दोन नंबरला आहे. आपल्या देशात ५७ टक्के मोबाईल बनवले जातात, असंही जे.पी.नड्डा म्हणाले.

टॅग्स :ChandrapurBjpjp nadda