आम्ही हिंदुत्व सोडलं नाही असं म्हणण्याची वेळ बाळासाहेबांवर आली नाही - दानवे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

raosaheb danave

आम्ही हिंदुत्व सोडलं नाही असं म्हणण्याची वेळ बाळासाहेबांवर आली नाही - दानवे

मुंबई : काल मुंबईतील बीकेसी मैदानात शिवसेनेची जाहीर सभा झाली. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना फटकारलं. सभेनंतर त्यांच्यावर विरोधकांनी टीका केली असून आज भाजपाचे रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी शिवेसेनेवर टीका केली आहे.

(BJP Raosaheb Danve On CM Uddhav Thackeray Sabha)

"राज्यातील लोकांना या सभेबद्दल उत्सुकता होती, पण मुख्यमंत्र्याचं भाषण ऐकल्यावर सगळ्यांची निराशा झाली. मुख्यमंत्र्यांच्या तोंडून आम्ही राज्यातील जनतेसाठी काय करणार आहोत, काय केलं आहे याबद्दल बोलणं अपेक्षित होतं पण ते विकासाच्या मुद्द्यावर बोलले नाहीत."असं ते म्हणाले.

हेही वाचा: "फडणवीस चढले जरी असते तरी बाबरी त्यांच्या वजनाने खाली आली असती": उद्धव ठाकरे

"तुम्ही म्हणता आम्ही हिंदुत्व सोडलं नाही आणि आम्हाला प्रमाणपत्र देण्याची गरज नाही, पण बाळासाहेबांना कधी आम्ही हिंदुत्व सोडलं नाही असं बोलायची वेळ आली नाही." असा टोला त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लावला.

"राज्यातल्या जनतेला कुठल्याही प्रकारचा दिलासा न देता त्यांनी फक्त भाजपावर टीका केली. फक्त तुम्ही हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बोलत होता अन् तुम्ही सांगता की आम्ही हिंदुत्व सोडलं नाही पण तुम्ही ज्यावेळी भाजपला सोडलं त्यावेळीच तुम्ही हिंदुत्व सोडलं आहे." असा टोला लावला.

हेही वाचा: चितळेंना बाकरवडीची रेसिपी एका 'गुजराती' माणसाने सांगितलेली

"जे लोकं तुम्हाला हिनवत होते त्या लोकांच्या पंगतीत तुम्ही जाऊन बसले आहात म्हणजे तुम्ही आता हिंदुत्व सोडलं आहे, तुम्ही हिंदुत्वाच्या गप्पा आता बंद करा." असं म्हणत त्यांनी बाबरीच्या वेळी मी तिथे होतो पण एकही शिवसैनिक तिथे नव्हता अशी टीका केली .

Web Title: Bjp Raosaheb Danve On Uddhav Thackeray Sabha Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top