
ईडीने खरंच क्लोजर रिपोर्ट सादर केला असेल तर भाजपने सरनाईक कुटुंबीयांची माफी मागावी. अशी मागणी राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी केली आहे. (bjp should apologize to saranaik family say ncp mp supriya sule )
मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हा अन्वेषण विभागाने टॉप सिक्युरिटी घोटाळा प्रकरणात कोर्टात क्लोजर रिपोर्ट सादर केला. आता ईडीदेखील याच अहवालाच्या आधारे क्लोजर रिपोर्ट सादर करणार असल्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करत भाजपने सरनाईक कुटुंबीयांची माफी मागावी अशी मागणी केली आहे.
जर ईडीने खरंच क्लोजर रिपोर्ट सादर केला असेल तर भाजपने सरनाईक कुटुंबीयांची माफी मागावी. ईडीच्या क्लोजर रिपोर्टनुसार खरंच सरनाईक कुटुंबीय निर्दोष असेल तर भाजपने जाहीर माफी मागावी कारण या प्रकरणाची क्रोनोलॉजी समजून घेतली तर ही उघड उघड ब्लॅकमेलिंग होतं हे दिसतंय, अशी टीका सुळे यांनी केली.
तसेच, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या बारामती दौऱ्यावरही पुन्हा भाष्य केलं. मी पहिलेच सांगितले की, अर्थमंत्री सीतारमण यांचं बारामती मतदारसंघात स्वागतच आहे. कसं आहे हे, ज्या झाडाला आंबे त्याच झाडाला लोक दगडं मारतात म्हणूनच सातत्याने बारामती टार्गेट होत आहे. पण जनता सुजान हे भाजपचा हा खडखडाट बारामतीकरांना चांगला समजतोय. आम्ही आपलं विकासाची कामं सुरूच ठेवणार, असा टोलाही सुळे यांनी भाजपला लगावला.
प्रताप सरनाईक यांचे काय आहे प्रकरण?
प्रताप सरनाईक यांच्याविरोधात MMRDA टॉप्स सुरक्षा भरती प्रकरणी सखोल चौकशी करण्यात आली मात्र त्यात कोणताही घोटाळा झाला नसून या प्रकरणात कोणताही गुन्हा घडला असं निदर्शनास आले नाही. त्यामुळे या प्रकरणाचा तपास बंद करत असून तसा अहवाल आम्ही न्यायालयात सादर करतोय, तो न्यायालयाने मान्य करावा असं पत्र EOW ने कोर्टात दिले होते. ते बुधवारी कोर्टाने मान्य करत तपास बंद करण्यास EOW ला परवानगी दिली आहे.
दरम्यान EOW ने दाखल केलेल्या या गुन्ह्याच्या आधारावर ED ने त्यांच्याकडे गुन्हा दाखल केला होता आणि तपास करत आमदार प्रताप सरनाईक यांची चौकशी केली होती तर सरनाईकांच्या जवळच्या व्यक्तींची चौकशी देखील केली होती. तर आता EOW ने सादर केलेल्या प्रकरणाचा तपास बंद करण्याच्या अहवालावर धर्तीवर केंद्रीय तपास यंत्रणा अंमल बजावणी संचालनालय म्हणजे ED देखील प्रताप सरनाईक यांना दिलासा देणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.