esakal | शिवसेनेने तत्त्वे गुंडाळून कोपऱ्यात ठेवली : चंद्रकांत पाटील
sakal

बोलून बातमी शोधा

शिवसेनेने तत्त्वे गुंडाळून कोपऱ्यात ठेवली : चंद्रकांत पाटील

आम्ही नैतिकता पाळली. त्यांनी मुलाला मंत्री करण्यासाठी मात्र दगाबाजी केली. सत्तेसाठी उद्धव ठाकरे यांनी आपली तत्त्वे गुंडाळून ‘मातोश्री’च्या कोपऱ्यात गुंडाळून ठेवली, अशी सणसणीत टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली.

शिवसेनेने तत्त्वे गुंडाळून कोपऱ्यात ठेवली : चंद्रकांत पाटील

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई - शिवसेनेकडे दिवसातून दोन वेळा दिल्लीत सोनिया गांधी आणि शरद पवार यांना भेटायला वेळ होता; मात्र आमचा फोन उचलायला वेळ नव्हता. आम्ही नैतिकता पाळली. त्यांनी मुलाला मंत्री करण्यासाठी मात्र दगाबाजी केली. सत्तेसाठी उद्धव ठाकरे यांनी आपली तत्त्वे गुंडाळून ‘मातोश्री’च्या कोपऱ्यात गुंडाळून ठेवली, अशी सणसणीत टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

भाजप-शिवसेना युतीला लोकसभा निवडणुकीत भरभरून यश मिळाले. विधानसभेतही मतदारांनी युतीवर विश्‍वास दाखवत भरभरून जागा दिल्या; मात्र शिवसेनेने दगाबाजी केल्याने सत्तेचे गणित फिरल्याचे पाटील म्हणाले. आमच्या सरकारने घेतलेले लोकाभिमुख निर्णय रद्द करण्याचा सपाटाच ठाकरे सरकारने लावला आहे. त्यांनी सारथी, जलयुक्त शिवारसारख्या योजनांना स्थगिती दिली. सावरकरांचा मुद्दाही त्यांनी गुंडाळून ठेवला. सावरकरांवर टीका केली तरी त्यांना काहीच वाटत नाही. छत्रपतींच्या वंशजांचा अपमान केला जातोय, छत्रपतींच्या पुतळ्याची विटंबना होत असताना हे सरकार मात्र सत्तेला चिकटलेले सरकार आहे. त्यांना पाडायचा आम्ही प्रयत्न करत नाही, ते स्वतःच्या कर्माने पडेल, असेही पाटील म्हणाले.

त्यांच्याकडून जनादेशाचा अनादर 
महाराष्ट्रात युतीला स्पष्ट बहुमत मिळाले होते; मात्र, वैयक्तिक स्वार्थासाठी ‘त्यांनी’ जनादेशाचा अनादर केल्याची टीका भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी शिवसेनेचे नाव न घेता केली. मात्र, आपल्याला त्याचा विचार न करता पुढे काम करून पुन्हा सत्ता खेचून आणायची आहे. त्यासाठी कामाला लागण्याचे आदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिले. भाजप हा विचारांवर, संघटनात्मक कामावर  उभा राहिलेला पक्ष आहे. अन्य पक्ष वंशवादाने प्रेरित आहेत. आमचा पक्ष हा एक परिवार आहे; तर अन्य पक्ष हे परिवारांचा पक्ष आहेत. देशाच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध असून, देशातील अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलरची करायचा, आमचा उद्देश असून, यासाठी सर्वांनी झपाटून काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.

loading image