
Sudhir Mungantiwar : नेमके मुनगंटीवार परदेशात अन् त्यांच्या खात्यात पैशांचा बाजार; भाजपच्याच चार आमदारांचं पत्र
सुधीर मुनगंटीवार परदेशात गेले असताना त्यांच्या खात्यात पैसे घेऊन बदल्या झाल्याचा आरोप भाजप चार आमदारांकडून करण्यात आला आहे. यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यानंतर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या वनविभागातील बदल्यांना स्थगिती दिली आहे. वनमंत्री परदेश दौऱ्यावर असताना २०० पेक्षा जास्त आधिकाऱ्यांच्या बदल्या पैसे घेऊन केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तक्रार कोणी केली?
भाजपचे आमदार हरिभाऊ बागडे, राम सातपुते, रणधीर सावरकर आणि आशिष जयस्वाल या चार आमदारांनी वनमंत्र्यांकडे याबद्दल पत्र लिहून लेखी तक्रार केली आहे. याबद्दल एबीपी माझाने वृत्त दिले आहे.
वन विभागातील रेंज फॉरेस्ट बदल्यांमध्ये अनियमितता झाल्याच्या तक्रारी आल्याचे आमदारांकडून सांगण्यात आलं आहे. यावेळी पैशांची देवाण-घेवाण झाल्याचे देखील सांगीतले जात आहे.
मुनगंटीवार काय म्हणाले?
दरम्यान या प्रकरणावर बोलतना मुनगंटीवार म्हणाले की, माझ्या अनुपस्थितीत बदल्या झाल्या नाहीत. या बदल्यांच्या आधिकाराबद्दल मी ज्या खात्याचा मंत्री होतो तेथे ९० टक्के फाइल्स या माझ्यापर्यंत येऊ नयेत, मी पॉलिसी मेकिंग करावी आणि माझ्यापर्यंत प्रत्येक फाइल्स याव्यात असा माझा अग्रह नसतो. बदल्यांच्या फाइल्स कृपया माझ्यापर्यंत पाठवू नका, बदल्या तुमच्या स्थरावर पारदर्शकने करा हे अधिकार पीसीसीएफलाच दिलेत.
मुनगंटीवारांनी स्पष्ट केलं की याप्रकरणात आर्थिक देवघेणीची चर्चा नव्हती, तर चार आधिकारी आहेत ज्यांच्याबद्दल गंभीर तक्रारी आमदारांनी केल्या आहेत. त्यामुळे कोणती बदली करताना गुणवत्ता आणि काम तपासून घ्या अशा सूचना दिल्याचे मुनगंटीवरार म्हणाले. चार तक्रारी आल्या त्या तपासायला पाठवल्या आणि त्या तपासल्यानंतर त्याचा निर्णय विभाग करेल, हे आधिकार देखील विभागाला दिलेत. बदल्यांमध्ये मंत्र्यांनी गुंतावं या भूमिकेचा मी नाही असेही मुनगंटीवार म्हणाले. ते एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलत होते.