भाजपनेही भारत जोडो यात्रेला पाठिंबा द्यायला हवा; मोदी-शहांच्या भेटीपूर्वी राऊतांचं आवाहन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sanjay-Raut-Pm-Modi-Amit-Shah

भाजपनेही भारत जोडो यात्रेला पाठिंबा द्यावा; मोदी-शहांच्या भेटीपूर्वी राऊतांचं आवाहन

नवी दिल्ली - शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेतली. राऊत यांची बुधवारी रात्री तब्बल १०३ दिवसांनी कारागृहातून सुटका झाली. राऊत यांनी आज शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर पवारांची भेट घेतली. या भेटीनंतर राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार असल्याचं म्हटलं. (Sanjay Raut news in Marathi)

हेही वाचा: Worlds Tallest Shiva Statue : जगातील सर्वात उंच भगवान शंकरांची मूर्ती कोणत्या राज्यात आहे?

लोक कल्याणासाठी आपण या नेत्यांच्या भेटी घेणार असल्याचं राऊत यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी काँग्रेसनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या भारत जोडो यात्रेबाबत मोठं विधान केलं.

राऊत म्हणाले की, काँग्रेसची भारत जोडो देशातील कटुता संपविण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. ही एक चळवळ आहे. देशातील कटुता दूर करण्यासाठी ही यात्रा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे भाजपने देखील या यात्रेला पाठिंबा द्यावा, असं आवाहन राऊत यांनी मोदी आणि शहा यांच्या भेटीआधी केलं आहे. शिवाय काँग्रेसची भारत जोडो यात्रा ही भाजपच्या विरोधात नसून लोकांना एकत्र करण्यासाठी असल्याचं राऊत यांनी म्हटलं.

तत्पूर्वी राऊत यांनी कारागृहातून सुटल्यानंतर आपल्याला कारागृहात टाकण्याची देशाच्या राजकारणातील सर्वात मोठी चूक असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे राऊत भाजपवर जोरदार हल्लाबोल करणार हे निश्चित होते. मात्र राऊत यांची भाषा मवाळ झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.