नाशिक - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजप व महायुतीचे सर्व उमेदवार निवडून आणायचे आहेत. विजयासाठी आवश्यक असलेले ५१ टक्के मत मिळवण्यासाठी आम्ही कामाला लागलो आहोत, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली..प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. भाजपमध्ये येऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी पक्षाचे दरवाजे उघडे आहेत. सुधाकर बडगुजर यांच्याबाबतचा निर्णय मंत्री गिरीश महाजन घेतील, असे सांगत बावनकुळे यांनी त्यांच्या पक्षप्रवेशाला अप्रत्यक्ष हिरवा कंदील दाखविला..भाजपची उत्तर महाराष्ट्र विभागीय कार्यशाळा गुरुवारी नाशिकमध्ये पार पडली. या कार्यशाळेसाठी आलेल्या मंत्री बावनकुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते सुधाकर बडगुजर यांची पक्षाने हकालपट्टी केल्यानंतर त्यांच्या भाजप प्रवेशाची जोरदार चर्चा सुरू आहे..त्यावरून भाजपत विरोधाचा सूर उमटत आहे. याबाबत विचारले असता बावनकुळे म्हणाले, ‘आमदार सीमा हिरे यांचा विरोध असणे स्वाभाविक आहे. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांमध्ये बडगुजर हे हिरे यांच्या विरोधात लढले होते..त्यावेळी आरोप-प्रत्यारोप झाले. त्यातून गैरसमज निर्माण होतो, ठाकरे बंधूंमुळे फरक पडत नाही राज व उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चेवर बावनकुळे म्हणाले, की ठाकरे बंधू एकत्र आले तरी भाजप व महायुतीला काही फरक पडणार नाही..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.