esakal | भाजप आता पश्चिम महाराष्ट्रातही काढणार 'महाजनादेश'
sakal

बोलून बातमी शोधा

भाजप आता पश्चिम महाराष्ट्रातही काढणार 'महाजनादेश'

महाजनादेश यात्रेचे हे दोन टप्पे मिळून 150 विधानसभा मतदारसंघातून यात्रा काढण्यात आली होती. त्यानंतर आता तिसऱ्या टप्प्यात यात्रा काढली जाणार आहे. 

भाजप आता पश्चिम महाराष्ट्रातही काढणार 'महाजनादेश'

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून राज्यभरात महाजनादेश यात्रा काढली जात आहे. आत्तापर्यंत या यात्रेचे दोन टप्पे पूर्ण झाले असून, येत्या 13 सप्टेंबरपासून तिसरा टप्पा सुरु होणार आहे. या टप्प्यात पश्चिम महाराष्ट्रावर प्रामुख्याने लक्ष केंद्रित केले जाणार आहे.

पश्चिम महाराष्ट्रात काढली जाणारी भाजपची ही महाजनादेश यात्रा 7 दिवस म्हणजे 13 ते 19 सप्टेंबर या कालावधीपर्यंत चालणार आहे. ही यात्रा विशेषत: अहमदनगर आणि पश्चिम महाराष्ट्र भागात असणार आहे. यापूर्वी विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र या भागातून 1 ते 9 ऑगस्ट या कालावधीत पहिला टप्पा पार पडला. यामध्ये एकूण 14 जिल्ह्यांत ही यात्रा निघाली होती. या पहिल्या टप्प्याचा समारोप नंदुरबार येथे झाला होता. 

त्यानंतर 18 जिल्ह्यांसाठी महाजनादेश यात्रेचा दुसरा टप्पा 17 ऑगस्टला सुरू झाला. या यात्रेच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधण्याचा प्रयत्न करण्यात आला.  

दरम्यान, महाजनादेश यात्रेचे हे दोन टप्पे मिळून 150 विधानसभा मतदारसंघातून यात्रा काढण्यात आली होती. त्यानंतर आता तिसऱ्या टप्प्यात यात्रा काढली जाणार आहे. 

loading image
go to top