MLA Jaykumar Gore
MLA Jaykumar Goreesakal

Jaykumar Gore : 'लोकसभा निवडणुकीत भाजप महाराष्ट्रात 45 पेक्षा जास्त जागा जिंकणार'

आगामी लोकसभा निवडणुकांसाठी भाजपनं जोरदार तयारी सुरू केली आहे.
Summary

माढ्यावर पुन्हा वर्चस्व राखण्यासाठी हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. त्यादृष्टीनं पहिली बैठक बोराटवाडीतच घेण्यात आली.

बिजवडी (सातारा) : माढा भाजपचा (BJP) बालेकिल्ला असल्याचं आपल्याला दाखवून द्यायचं आहे. आपले खासदार तरुण असून, केंद्रीय नेतृत्व त्यांच्याकडं मोठ्या उमेदीनं पाहात आहे. आपल्याला यश मिळवायचंच आहे. त्यासाठी सर्वांनी तयारीला लागायचं आहे. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर मतदारसंघात गट आणि गणनिहाय दौरा करणार असल्याचं भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे यांनी सांगितलं.

बोराटवाडी (ता. माण) इथं भाजपची नुकतीच बैठक झाली. त्या वेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर (Ranjit Singh Naik Nimbalkar), आमदार रणजितसिंह मोहिते- पाटील, मतदारसंघाचे प्रभारी आमदार प्रशांत परिचारक, आमदार राम सातपुते, धैर्यशील मोहिते- पाटील, राजकुमार पाटील, जयकुमार शिंदे, शशिकांत चव्हाण, के. के. पाटील, शिवाजीराव शिंदे, धनंजय चव्हाण, अरुण गोरे, बजरंग गावडे, सोमनाथ भोसले, हरिभाऊ जगदाळे, विशाल बागल आणि लोकसभा मतदारसंघातील तालुकाध्यक्ष उपस्थित होते.

MLA Jaykumar Gore
Udayanraje Bhosale Birthday: माझं वय सांगायचा कुणी प्रयत्न केला तर कोणालाच सोडणार नाही; उदयनराजेंचा थेट इशारा

आमदार गोरे (Jaykumar Gore) म्हणाले, ‘‘माढा मतदारसंघातील (Madha Constituency) दुष्काळी भागाला केंद्र सरकारने भरीव निधी दिला आहे. आता राज्यातही आपलेच सरकार आहे. या मतदारसंघातील कामांची गती वाढवून जनतेला अपेक्षित असलेला विकास आपण साधत आहोत. भाजपच्या अजेंड्याप्रमाणे राज्यातून 45 पेक्षा अधिक जागा जिंकायच्या आहेत. आगामी लोकसभा निवडणुकांसाठी (Lok Sabha Election) भाजपनं तयारी सुरू केली आहे. माढ्यावर पुन्हा वर्चस्व राखण्यासाठी हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. त्यादृष्टीनं पहिली बैठक बोराटवाडीतच घेण्यात आली.’’

MLA Jaykumar Gore
Kolhapur : घोटाळ्यांची चौकशी सुरूच राहणार; कोल्हापुरात येऊन सोमय्यांचं मुश्रीफांना ओपन चॅलेंज

सर्व तालुकानिहाय आढावा

गेल्या लोकसभा निवडणुकीत अनेक नाट्यमय घडामोडी आणि उलथापालथींनी गाजलेल्या माढा लोकसभा मतदारसंघात शत प्रतिशत भाजपचा अजेंडा पुन्हा एकदा सुरू झाला आहे. या मतदारसंघावर पुन्हा एकदा वर्चस्व राखण्यासाठी भाजप कोअर कमिटीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्या अनुषंगाने गेल्या निवडणुकीचे किंगमेकर, पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे यांच्या बोराटवाडी येथे बैठक झाली. बूथ कमिट्यांपासून मतदारसंघातील सर्व तालुक्यांमधील गट आणि गणनिहाय आढावा घेऊन ‘माढा आणि या वेळेलाही विरोधकांना गाडा’ असा नारा देण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com