esakal | भाजपची महाजनादेश यात्रा पुन्हा एकदा स्थगित
sakal

बोलून बातमी शोधा

bjp.jpg

देशाचे माजी केंद्रीय मंत्री अरूण जेटली यांचं आज निधन झालं. ते 66 वर्षांचे होते. या कारणास्तव भाजपने त्यांची महाऱाष्ट्रात सुरु असलेली महाजनादेश यात्रा पुन्हा एकदा स्थगित केली आहे.

भाजपची महाजनादेश यात्रा पुन्हा एकदा स्थगित

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

भुसावळ (जळगाव) : देशाचे माजी केंद्रीय मंत्री अरूण जेटली यांचं आज निधन झालं. ते 66 वर्षांचे होते. या कारणास्तव भाजपने त्यांची महाऱाष्ट्रात सुरु असलेली महाजनादेश यात्रा पुन्हा एकदा स्थगित केली आहे.

या अगाेदर सुषमा स्वराज यांचे निधन आणि पुरामुळे यात्रा स्थगित करावी लागली हाेती. आता परत यात्रा स्थगित करत असल्याची घाेषणा मुख्यमंत्र्यांनी आज केली. गेल्या काही दिवसांपासून जेटली हे आजारी होते. त्यांना श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. अखेर त्यांची प्राणज्योत आज मालवली.  

loading image
go to top