अंध आर्यन जोशी करतोय बुद्धिबळात लक्षवेधी कामगिरी 

योगेश घोडके
शनिवार, 20 मे 2017

सांगली - काळ्या-पांढऱ्या चौकटींनी भरलेल्या पटावरील पुढची चाल आपणाला कुठे नेईल, याचा डोळे विस्फारून, डोक्‍याला हात लावून गहन विचार करणारे खेळाडू म्हणजे बुद्धिबळपटू. पण, त्या पटावरील प्यादी, घोडा, राजा अन्‌ उंट कुठे आहे हे डोळ्यानं पाहू न शकणारा अंध खेळाडूही चौसष्ट घरांचा "काबील' राजा बनू शकतो, हे डोंबीवलीच्या आर्यन जोशी याने दाखवण्याचा निर्धार केला आहे. या अंध खेळाडूची बुद्धिबळातील वाटचाल आशावर्धक असून तो डोळस बुद्धिबळपटूंना तगडे आव्हान देतोय. 

आर्यन सध्या दहावीत शिकतो. त्याने नुकत्याच येथे झालेल्या नूतन बुद्धिबळ मंडळाच्या बुद्धिबळ महोत्सवात सहभाग घेतला. त्याला बाजी मारता आली नाही, मात्र आपल्या खेळाने साऱ्यांना प्रभावित केले. वडील भालचंद्र जोशी हेच त्याचे डोळे आहेत. त्यांच्या सहकार्याने या पटावर राज्य करण्याचा त्याचा मानस आहे. जन्मजात अंध असलेला आर्यन म्हणतो,""मला रंग माहितीच नाही, त्याचं कधी वाईटही वाटलं नाही. बुद्धिबळ हा बुद्धीचा खेळ आहे, देवाने मला ती दिलीय. त्याचा आनंद घेतोय.'' असं तो सांगतो. 

वडिलांनी त्याला 2012 पासून पुस्तके वाचून बुद्धिबळाचे धडे दिले. थोडं ऐकूण, थोडं स्पर्शातून मी चाली शिकत गेलोय. एकेक चाल शिकायला 3 वर्षे लागली. "डी-फोर' तंत्राच्या सहाय्याने डाव खेळायला लागलो. त्यावरील प्रेम वाढत गेले. गेल्यावर्षी रघुनंदन गोखले यांच्याकडे बुद्धिबळाचे धडे घ्यायला सुरवात केली. यंदा एप्रिलमध्ये हैदराबाद येथे झालेल्या दृष्टिबाधित बुद्धिबळ स्पर्धेत 120 जणांत तो पहिला आला. धारावीत राष्ट्रीय दृष्टिबाधित स्पर्धेत चौथा आला. जागतिक चेस ऑलिंपियाडसाठी निवड झाली. आशियाई चषकात चौथा आला. गेल्यावर्षी राज्य व राष्ट्रीय अपंगांच्या स्पर्धेत चार सुवर्ण पटकावले. 

तो म्हणाला,""मला पोहण्याचीही आवड आहे. त्या स्पर्धेतही सहभागी होतो. मित्राच्या साथीने सहावेळा ट्रेकिंग केले आहे. अंध मुलांसाठी काहीतरी करण्याचा माझा निर्धार आहे.''

Web Title: Blind Aryan Joshi Chess performance