Bharat Jodo Yatra: आमची यात्रा रोखून दाखवा; राहुल गांधीचं विरोधकांना आव्हान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rahul Gandhi

Bharat Jodo Yatra: आमची यात्रा रोखून दाखवा; राहुल गांधीचं विरोधकांना आव्हान

कन्याकुमारी ते काश्मीर अशी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरू आहे. ही यात्रा सध्या महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रातील यात्रेदरम्यान एक वेगळं चित्र पाहायला मिळालं आहे. तळागाळातील लोक भारत जोडो मध्ये सामील होत आहेत. इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रात देखील यात्रेला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. यात्रा कर्नाटकात असताना राहूल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका केली होती. त्यावरून भाजप आणि शिंदे गटाने आक्षेप घेतल्याचं दिसत आहे.

हेही वाचा : Gautami Patil- लावणीचा बाजच अश्लीलतेचा?

राहुल गांधी यांच्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या वक्तव्यावर शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी जोरदार टीका केली होती. राहुल गांधी यांचं वक्तव्य निंदनीय असल्याचंही शेवाळे यांनी म्हटलं होतं. तर त्यांनी भारत जोडो यात्रा महाराष्ट्रातच थांबवावी, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. दरम्यान आज अकोल्यात राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी भारत जोडोच्या विरोधकांना आणि शेवाळे यांना भारत जोडो यात्रा बंद करून दाखवा असं म्हणत थेट आव्हानच दिलं आहे.

हेही वाचा: Balasaheb Thackeray: CM शिंदेंनी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर दर्शन घेताच शिंपडले गोमूत्र

काय म्हणाले राहुल गांधी?

भारत जोडो यात्रा कन्याकुमारीमध्ये सुरू झाली आहे. ती जम्मू काश्मीरमध्ये जाऊन थांबेल. भारत जोडो यात्रा तुम्ही थांबवून दाखवा. ही यात्रा विचारांची आहे. समानतेची आहे.

काय म्हणाले राहुल शेवाळे?

स्वातंत्र्यावीर सावरकर यांच्यावर केलेल्या वक्तव्यामुळे राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रातच थांबवावी. हे राज्य कायद्याचं आणि सावरकरांचं आहे असं दाखवून देऊया, असं राहुल शेवाळे म्हणाले आहेत. राहुल गांधीच्या वक्तव्याविरोधात कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी आंदोलन करावं, असं आवाहन देखील त्यांनी यावेळी केलंय.

टॅग्स :BjpRahul GandhiNCP