समीर वानखेडेंना हायकोर्टाकडून धक्का; आर्यन खान प्रकरणी तपासावर प्रश्नचिन्ह | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aryan Khan

समीर वानखेडेंना हायकोर्टाकडून धक्का; आर्यन खान प्रकरणी तपासावर प्रश्नचिन्ह

मुंबई: आर्यन खान प्रकरणात समीर वानखडेंना मोठा धक्का बसला आहे. NCB ने कट रचल्याचे कलम लावण्यात आले होते पण त्या बाबत पुरावे न्यायालयाच्या निदर्शनास आले नाही. त्यामुळे NCB च्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हा आर्यनच्या चॅटमध्ये ही अरबाज मुनमुन यांच्यात पार्टीबाबत अंमली पदार्था नेण्यासंदर्भात कोणतेही चॅट आढळून आले नाही.

NCB आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांच्या कथित कबुली जबाबावर विसंबून राहू शकत नाही. सुप्रीम कोर्टाच्या निकालानुसार, अशी विधाने पुराव्यात अमान्य आहेत, असे मुंबई मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे. अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांच्यात अंमली पदार्थांशी संबंधित गुन्हे करण्याचा कट रचल्याचा कोणताही सकारात्मक पुरावा नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाने आज जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे. तसेच आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली नाही, जेणेकरुन संबंधित वेळी त्यांनी अंमली पदार्थांचे सेवन केले होते की नाही, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने जामीन आदेशात नोंदवले आहे. या तिघांविरोधात एनसीबीकडे ठोस पुरावे नसल्याचे निरीक्षणही न्यायालयाने नोंदवले आहे.

loading image
go to top