"लढण्याची प्रेरणा मिळते"; रोहित पवारांकडून जिजाऊंच्या जन्मस्थळी जाऊन दीपोत्सव साजरा

राजमाता माँ जिजाऊ यांना नतमस्तक होवून लढण्याची प्रेरणा मिळत असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केले
"लढण्याची प्रेरणा मिळते"; रोहित पवारांकडून जिजाऊंच्या जन्मस्थळी जाऊन दीपोत्सव साजरा

सिंदखेड राजा ता.१३- राजमाता माँ जिजाऊ यांना नतमस्तक होवून लढण्याची प्रेरणा मिळत असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केले. राजे लखुजीराव जाधव यांच्या राजवाड्यामध्ये आयोजित दीप उत्सवानिमित्त कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत वडील राजेंद्र पवार, आई सुनंदा पवार, बहिण सई पवार, पत्नी कुंती पवार इत्यादी उपस्थित होते.

रोहित पवार यांनी सांगितले की, युवा संघर्ष यात्रा सुरू झाल्यानंतर ज्या भागामध्ये आहे त्या भागांमध्येच दिवाळी साजरा करण्याचा शब्द त्यावेळी दिला होता,त्यामुळेच नागरिकांमध्ये राहून दीपावली साजरी करण्याचे ठरविले होते. त्यामुळे राजमाता माँ जिजाऊ यांच्या राजवाड्यामध्ये सहकुटूंब येवून दीप प्रज्वलित करून दिपावली साजरी केली आहे.

"लढण्याची प्रेरणा मिळते"; रोहित पवारांकडून जिजाऊंच्या जन्मस्थळी जाऊन दीपोत्सव साजरा
Sharad Pawar: मैदानात योद्धा जखमी झाला तरी... मॅक्सवेलची एका पायावरची इनिंग पाहून रोहित पवारांनां आठवले शरद पवार

माँ जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना संस्कार दिले. संस्कार हे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जात असतात, संस्कार म्हणजे चांगले विचार असतात. हेच विचार अगोदरच्या पिढीने जपले आहेत. महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये या देशातल्या मनामध्ये हा जो थोर व्यक्तींचा विचार वसलेला आहे,संतांचा विचार वसलेला आहे तो कोणालाही कितीही ताकद लावली तरी काढता येऊ नये अशी इच्छा माँ जिजाऊ च्या चरणी प्रार्थना केली असल्याचे ते म्हणाले.

राजवाड्यात ७० बाय ५० फूट जागेवर दिव्यांच्या माध्यमातून राजमाता माँ जिजाऊ साहेब यांची प्रतिमा तयार करण्यात आली होती. यावेळी आमदार रोहीत पवार यांच्यासह कुटूंबातील सदस्यांनी दीप प्रज्वलित करून दिपावली साजरी केली. तालुकाध्यक्ष राजेंद्र अंभोरे यांनी दीप उत्सवाचे नियोजन केले होते.

"लढण्याची प्रेरणा मिळते"; रोहित पवारांकडून जिजाऊंच्या जन्मस्थळी जाऊन दीपोत्सव साजरा
"नामदेव जाधव तोतया"; रोहित पवारांनी केली चौकशीची मागणी

यावेळी वंशज शिवाजी राजे जाधव,राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हा कार्याध्यक्ष नरेश शेळके, प्रसेन्नजी पाटील,तालुक अध्यक्ष राजेंद्र अंभोरे राजेश इंगळे,सुभाष राजे जाधव,गोपाळ राजे जाधव,विजय खांडेभराड, जहीर पठाण, सुनील झोरे, गजानन चित्ते,जहीर पठाण , अमोल भट ,अशोक मोगल, रंजीत पवार, अभय मोगल,योगेश शेरे यांच्यासह पदाधिकारी व नागरिक युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Latest Marathi News)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com