राज्यात जिल्ह्यांनुसार वेगवेगळे निर्बंध; जाणून घ्या नवी नियमावली

Weekend Lockdown
Weekend LockdownTeam esakal
Summary

'ब्रेक दि चेन'चे (break the chain) आदेश सर्वत्र एकसारखे लागू करण्यात येणार नाहीत, तर पालिका, जिल्हा क्षेत्रातील पॉझिटीव्हीटी दर (positivity rate) आणि तेथील ऑक्सिजन खाटांची (oxygen beds) उपलब्धता याचा विचार निर्बंध वाढवले किंवा कमी केले जाणार आहेत.

मुंबई : राज्यात लॉकडाऊनचे निर्बंध शिथील करण्याचा निर्णय उद्धव ठाकरे सरकारने घेतला आहे. 'ब्रेक दि चेन'चे (break the chain) आदेश सर्वत्र एकसारखे लागू करण्यात येणार नाहीत, तर पालिका, जिल्हा क्षेत्रातील पॉझिटीव्हीटी दर (positivity rate) आणि तेथील ऑक्सिजन खाटांची (oxygen beds) उपलब्धता याचा विचार निर्बंध वाढवले किंवा कमी केले जाणार आहेत. यासाठी २९ मे २०२१ रोजी आठवड्याच्या शेवटी असलेला पॉझिटीव्हीटी दर आकडेवारी गृहित धरली जाणार आहे. तसेच ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता विचारात घेतली जाईल. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यानुसार वेगवेगळे निर्बंध असणार आहेत. याबाबत जिल्हा प्रशासन स्वतंत्र नियम जाहीर करतील. (break the chain positivity rate maharashtra lockdown uddhav thackeray)

२०११ च्या जणगणनेनुसार 10 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या सर्व महानगरपालिका कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी स्वतंत्र प्रशासकीय घटक म्हणून समजण्यात येईल. यात बृहन्मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, वसई-विरार, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर, औरंगाबाद, नाशिक या शहरांचा यात समावेश होतो. या पालिकांच्या क्षेत्रांव्यतिरिक्तचा जिल्ह्यातील उर्वरित भाग हा वेगळा प्रशासकीय घटक राहील. पुणे, मुंबई, नागपुर, लातूर, नाशिक, वाशिम, सांगली, नंदुरबार, पिंपरी-चिंचवड, परभणी, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथील करण्यात आले आहेत.

Weekend Lockdown
मुंबई महापालिकेची नवी नियमावली जाहीर; वाचा काय आहेत बदल

पॉझिटीव्हीटी दर १० टक्क्यांपेक्षा कमी असलेले जिल्हे आणि पालिकांसाठी नियमावली :

ज्या पालिका किंवा जिल्हा क्षेत्रात कोविड पॉझिटीव्हीटी दर 10 टक्के किंवा त्यापेक्षा कमी असेल तसेच एकूण उपलब्ध ऑक्सिजन बेड्स ४० टक्क्यांपेक्षा कमी भरले असतील तिथे १२ मे २०२१ "ब्रेक दि चेन' आदेशाप्रमाणे निर्बंध शिथिल होतील.

१) सर्व आवश्यक वस्तू व सेवांची दुकाने जी सध्या सकाळी ७ ते ११ या वेळेत सुरु आहेत, ती सकाळी ७ ते दुपारी २ या वेळेत सुरु ठेवता येतील.

२) आवश्यक गटात नसलेल्या इतर दुकानांना उघडणे आणि त्यांच्या वेळा (केवळ एकल दुकाने. मॉल्स किंवा शॉपिंग सेन्टर्स नव्हे) याबाबतीत स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण निर्णय घेईल. मात्र, आवश्यक गटातील दुकानाच्या वेळेप्रमाणेच त्यांच्या वेळा असतील तसेच शनिवार, रविवार ती बंद राहतील. अशा भागांत आवश्यक वस्तूंच्या जोडीने आवश्यक नसलेल्या वस्तू देखील ई-कॉमर्स माध्यमातून वितरीत करता येतील.

३) दुपारी ३ नंतर मात्र वैद्यकीय किंवा इतर आणीबाणीच्या प्रसंगांव्यतिरिक्त येण्याजाण्यावर निर्बंध असतील.

४) कोरोनाविषयक कामे करणाऱ्या कार्यालयांव्यतिरिक्त इतर सर्व शासकीय कार्यालये ही २५ टक्के कर्मचारी उपस्थितीनिशी सुरु राहतील. संबंधित विभाग प्रमुखास यापेक्षाही जादा उपस्थिती हवी असेल तर संबंधित आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी त्यास परवानगी देईल.

५) कृषिविषयक दुकाने आठवड्याच्या कामाच्या दिवसांना दुपारी २ पर्यंत सुरु राहू शकतील. येणारा पावसाळा व पेरणीच्या तयारीसाठी स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी या दुकानाच्या वेळा वाढवू शकते किंवा शनिवार, रविवार सुरु ठेवण्यास परवानगी देऊ शकते.

Weekend Lockdown
Pune Lockdown Relaxed: वाचा काय सुरु आणि काय बंद?

पॉझिटीव्हीटी दर २० टक्क्यांपेक्षा जास्त असलेले जिल्हे व पालिकांसाठी नियमावली :

ज्या पालिका किंवा जिल्ह्यांत पॉझिटीव्हीटी दर २० टक्क्यांपेक्षा जास्त असेल आणि एकूण उपलब्ध ऑक्सिजन बेड्स ७५ टक्क्यांपेक्षा जास्त भरले असतील तर तिथे १२ मे २०२१ "ब्रेक दि चेन' आदेशातील निर्बंध खालीलप्रमाणे वाढविण्यात येतील.

१) अशा जिल्ह्यांच्या सीमा पूर्णपणे बंद करण्यात येतील आणि कुणाही व्यक्तीला जिल्ह्याच्या आत-बाहेर करण्यास परवानगी राहणार नाही. केवळ कुटुंबातील मृत्यू, वैद्यकीय कारण आणि आवश्यक, आणीबाणीच्या कोविड प्रसंगीची सेवा देणाऱ्या व्यक्तींचा अपवाद असेल.

२) या प्रशासकीय घटकांमध्ये न येणारी इतर सर्व जिल्हे व पालिकांच्या ठिकाणी १२ मे २०२१ चे "ब्रेक दि चेन'चे निर्बंध नेहमीप्रमाणे लागू राहतील.

३) दुकानांना पुरवठा केल्या जाणारा वस्तूंच्या वाहतुकीवर निर्बंध नाहीत हे पुन्हा एकदा स्पष्ट करण्यात आलं आहे. मात्र, दुकानांना ठरवून दिलेल्या वेळेनंतर ग्राहकांना विक्री करता येणार नाही. या नियमांचा भंग केल्यास दुकान कोरोना साथ जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत बंद ठेवण्यात येईल. तसेच १२ मे च्या आदेशाप्रमाणे दंडही आकारण्यात येईल. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी यांनी निश्चित केलेल्या वेळेनुसार होम डिलिव्हरी सुरूच राहतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com