esakal | ब्रेकिंग : सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेंसह पाच जण कोरोनाबधित
sakal

बोलून बातमी शोधा

beed News

धंनजय मुंडे यांच्यासह त्यांचे स्वीय सहाय्यक, चालक व कर्मचारी अशा पाच जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे तपासणीत समोर आलेले आहे. जिल्ह्यात असलेले मुंडे तीन दिवसांपूर्वी मुंबईला गेले होते.

ब्रेकिंग : सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेंसह पाच जण कोरोनाबधित

sakal_logo
By
दत्ता देशमुख

बीड : राज्याचे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यासह त्यांच्या सोबतच्या इतर चार कर्मचारी अशा पाच जणांना कोरोना विषाणूची बाधा झाल्याचे समोर आले आहे. 

मागच्या चार दिवसांत त्यांच्या संपर्कात आलेल्यांनी स्वत: होम क्वारंटाईन व्हावे व गरजेनुसार तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन बीडचे जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी केले. 
चार दिवसांपूर्वी म्हणजेच सोमवारी (ता. आठ जून) रोजी त्यांच्या हस्ते अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील विषाणू संशोधन व निदान प्रयोशाळेचे उद्‌घाटन झाले. त्यानंतर दोन दिवसांनी श्री. मुंडे मुंबईला गेले.

मुंबईला जातेवेळी त्यांच्यामध्ये कुठलेही कोरोनाची लक्षणे आढळली नाहीत. मात्र, गुरुवारी त्यांची कोरोना चाचणी केल्यानंतर धनंजय मुंडे यांच्यासह त्यांचे स्वीय सहाय्यक, चालक व इतरांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. यापूर्वीही आघाडीतील मराठवाड्यातील मंत्री अशोक चव्हाण यांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले होते. मात्र, उपचारानंतर ते नुकतेच बरे झाले. 

मागच्या चार दिवसांत धनंजय मुंडे यांच्यासह त्यांचे स्वीय सहाय्यक यांच्या संपर्कात आलेल्यांनी स्वत: क्वारंटाईन व्हावं, जवळच्या आरोग्य संस्थेशी संपर्क साधून तपासणी करुन घ्यावी.
- राहुल रेखावार ,जिल्हाधिकारी बीड