

पालघर - मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर कारला भीषण आग लागल्याची घटना घडलीय. पालघरच्या दापचरी सीमा शुल्क विभागाच्या तपासणी नाक्याजवळ धावत्या कारला भीषण आग लागली.. चालकाच्या प्रसंगावधानामुळे जीवितहानी टळली . शॉर्टसर्किटने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. कारमधील चारही प्रवासी सुखरूप असून आगीत कार जळून खाक झाली आहे.