esakal | मोठी ब्रेकिंग ! ब्रिटनमधील कोरोनाच्या भितीने सेट परीक्षेला 60 हजार विद्यार्थ्यांनी मारली दांडी
sakal

बोलून बातमी शोधा

0Exam_20studant_0 - Copy.jpg

कोरोनाची अजूनही वाटतेय भिती
राज्यातील कोरोनाची स्थिती आता सावरू लागली आहे. मात्र, ब्रिटनमध्ये कोरोनाचा दुसरा विषाणू आढळल्यानंतर भिती आणखी वाढली आहे. वाहतुकीची पुरेशी सोय नसल्यानेही विद्यार्थी परीक्षेला गैरहजर राहिले. गोवा व महाराष्ट्रातील 16 शहरांमधील 239 केंद्रांवर एमएस-सेट परीक्षा पार पडली असून त्यात 50 टक्‍क्‍यांहून अधिक विद्यार्थी उपस्थित राहिले नाहीत.
- बाळू कापडणीस, राज्य समन्वयक, सहायक प्राध्यापक पात्रता परीक्षा, पुणे

मोठी ब्रेकिंग ! ब्रिटनमधील कोरोनाच्या भितीने सेट परीक्षेला 60 हजार विद्यार्थ्यांनी मारली दांडी

sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाद्वारे आयोजित सहायक प्राध्यापक पदांसाठी आज (रविवारी)36 वी पात्रता परीक्षा (एमएस-सेट) पार पडली. या परीक्षेसाठी महाराष्ट्र व गोव्यातील एक लाख 11 हजार 106 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. दोन्ही राज्यांमधील 16 शहरांमधील 239 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा पार पडली. लॉकडाउनपूर्वी नोंदणी केलेल्यांपैकी अंदाजित 60 हजार विद्यार्थ्यांनी विविध कारणास्तव परीक्षेला दांडी मारली.

कोरोनाची अजूनही वाटतेय भिती
राज्यातील कोरोनाची स्थिती आता सावरू लागली आहे. मात्र, ब्रिटनमध्ये कोरोनाचा दुसरा विषाणू आढळल्यानंतर भिती आणखी वाढली आहे. वाहतुकीची पुरेशी सोय नसल्यानेही विद्यार्थी परीक्षेला गैरहजर राहिले. गोवा व महाराष्ट्रातील 16 शहरांमधील 239 केंद्रांवर एमएस-सेट परीक्षा पार पडली असून त्यात 50 टक्‍क्‍यांहून अधिक विद्यार्थी उपस्थित राहिले नाहीत.
- बाळू कापडणीस, राज्य समन्वयक, सहायक प्राध्यापक पात्रता परीक्षा, पुणे

पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाअंतर्गत 12 परीक्षा केंद्रांवरुन सहा हजार 79 विद्यार्थी परीक्षा देतील, असा अंदाज होता. मात्र, त्यातील दोन हजार 706 विद्यार्थी परीक्षेसाठी आलेच नाहीत. संगमेश्‍वर महाविद्यालय, वालचंद कॉलेज ऑफ कला व शास्त्र महाविद्यालय, कस्तुरबाई कॉलेज ऑफ एज्युकेशन, वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नालॉजी, डी. बी. एफ दयानंद कॉलेज, एस. ई. एस. पॉलिटेक्‍निक, सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय यासह अन्य परीक्षा केंद्रांवरील बहुतांश विद्यार्थी गैरहजर राहिले. परीक्षेपूर्वी एक तास अगोदर विद्यार्थ्यांनी उपस्थित राहणे अपेक्षित असतानाही पर्यवेक्षकांनी परीक्षा सुरु झाल्यानंतर 30 मिनिटांपर्यंत विद्यार्थ्यांची वाट पाहिली. मात्र, विद्यार्थी परीक्षेला आलेच नाहीत. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर वाहतुकीची नसलेली पुरेशी व्यवस्था, ब्रिटनमध्ये आढळलेला कोरोनाचा दुसरा विषाणू आणि लंडनहून महाराष्ट्रात आलेल्या प्रवाशांमुळे पालकांच्या मनात निर्माण झालेली भिती, पुणे, मुंबई, नाशिक, जळगाव, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा यासह अन्य काही जिल्ह्यांमधील कोरोनाची जैसे थेच स्थिती आणि विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सेट परीक्षेत काही विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. अशा प्रमुख कारणांमुळे तब्बल 60 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी एमएस-सेट परीक्षेला दांडी मारली.

सेट परीक्षेची स्थिती... 
एकूण विद्यार्थी नोंदणी
1,11,106
प्रवेशपत्र ऑनलाइन डाउनलोड
70,281
परीक्षेला उपस्थित विद्यार्थी
50,802
गैरहजर राहिलेले विद्यार्थी
60,304

loading image