
मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर जवळपास सहा महिन्यांनंतरही सात मंत्र्यांना खासगी सचिवांच्या नियुक्तीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची परवानगी मिळत नसल्याने विशेषत: शिवसेनेच्या मंत्र्यांची अडचण झाली आहे. यामुळे महायुतीमध्ये फार काही अलबेल नसल्याचे चित्र दिसत आहे. तसेच विविध मंत्र्यांच्या कार्यालयांत २२ विशेष कार्य अधिकाऱ्यांचीही नियुक्त्या स्थगित केल्यावरून महायुतीच्या मंत्र्यांमध्ये खदखद असल्याची चर्चा आहे.