Cabinet Expansion: मित्रपक्षांशिवाय सरकार चालत नाही; बच्चू कडूंचे मोठे वक्तव्य

तब्बल महिन्याभराच्या प्रतिक्षेनंतर आज राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होत आहे.
mla Bachchu Kadu
mla Bachchu Kaduesakal

तब्बल महिन्याभराच्या प्रतिक्षेनंतर आज राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होत आहे. सकाळी 11 वाजता राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होत आहे. या मंत्रिमंडळात 20 ते 25 जणांचा समावेश करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात मंत्रिमंडळ विस्तारात सर्वाधिक भाजप आमदार तर शिंदे गटातील मोजक्याच आमदारांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. या पहिल्या टप्प्यातून मात्र, अपक्ष आमदारांना वगळण्यात आल आहे. यावर बोलताना अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी मोठं वक्तव्य केले आहे. मित्रपक्षांशिवाय सरकार चालत नसल्याचे बच्चू कडूंनी म्हटले आहे.( Cabinet Expansion maharashtra Independent mla Bachchu Kadu on waiting)

आज सकाळी रखडलेला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होत आहे. पहिल्या टप्प्यातील या मंत्रिमंडळ विस्तारात भाजपच्या सर्वाधिक आमदारांचा शपथविधी होणार आहे. तर शिंदे गटातील मोजक्याच आमदारांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. मात्र, शिंदे गटाच्या एकाही अपक्ष आमदाराचा पहिल्या टप्प्यात शपथविधी होणार नसल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, बच्चू कडू यांनी माध्यामांशी संवाद साधला.(Cabinet Expansion)

माध्यामांशी बोलताना बच्चू कडू यांनी मंत्रीमंडळ विस्तारावर बोलण टाळलं. मंत्रीमंडळ विस्तारप्रकरणी चर्चेत येण्यापेक्षी शेतकरी, अपंग यांच्या प्रश्नासंदर्भात चर्चत आलो तर बर होईल. तसेच यावेळी, विस्ताराबाबत मुख्यमंत्र्याच्या भेटीला निघालो असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

दरम्यान, अपक्ष आमदारांना वगळण्यात असल्याची चर्चा सूरू आहे. यासंदर्भात विचारले असता. अपक्ष आणि आमचा प्रहार पक्ष आहे. मित्रपक्षांशिवाय सरकार चालत नाही असे मोठे वक्तव्य करत निश्चित त्यावर निर्णय होईल. असा विश्वासदेखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.

तसेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला शब्द दिला होता. येणाऱ्या विस्तारात मंत्रीपद देऊ असं ते म्हणाले होते. मात्र, आता काही तांत्रिक कारण असेल, त्यामुळे अपक्षांना मंत्रीपद देण्यात आले नाही. कधी कधी दोन पावलं मागे यावं लागतं. त्यामुळे मी अजूनही त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवतो आहे असही ते यावेळी म्हणाले.

20 ते 25 आमदारांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. यात शिंदे गटाचे किती आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आणि भाजपचे किती आमदार मंत्रीपदाच शपथ घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मात्र, शिंदे गटाने पहिल्या टप्प्यात अपक्षांना संधी न देण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे. अपक्षांना अधिवेशनानंतरच मंत्रिमंडळात सामावून घेतलं जाणार आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com