मुंबई - इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विमाप्र समाजाच्या प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी मराठा समाजासाठी स्थापन करण्यात आलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या धर्तीवर उपसमिती स्थापन करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून मंत्री छगन भुजबळ आणि मंत्री दत्तात्रेय भरणे यांची या समितीवर वर्णी लागणार आहे.